रेल्वे रुळांशेजारी असलेल्या लोखंडी खांबाला धडकल्यानं तरुणाचा मृत्यू झाला आहे. पंजाबच्या लुधियानात ही घटना घडली. खन्नामधील चावा रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा मृत्यू झाला. सुसाट धावणाऱ्या रेल्वेच्या दारात उभा राहून तरुण स्टंट करत होता, दरवाज्याबाहेर लटकत होता.

ट्रेनमधून पडल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला स्टेशन मास्तरांनी दिल्याचं रेल्वे पोलीस अधिकारी कुलवंत सिंह यांनी सांगितलं. तपासादरम्यान पोलिसांना एक व्हिडीओ सापडला. त्यात मृत्यूमुखी पडलेला तरुण एक्स्प्रेस ट्रेनच्या दरवाज्यावर लटकताना दिसत होता.
मृताकडे कोणताही मोबाईल, ओळखपत्र सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे तरुणाचा मृतदेह खन्नातील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. लुधियानाहून अंबाला जाणाऱ्या मालवा एक्स्प्रेसमध्ये तरुण स्टंट करत होता.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.