रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा इथे पाणी समजून महिलेने असं काही प्यायली की एका नेपाळी विवाहितेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला आहे. बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी रत्नागिरी पोलीसांनी दिली.

तुलसीदास पदम लामा ( २७, मुळ रा. नेपाळ सध्या रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा पती पदम राम बहाद्दूर लामा (२६, मुळ रा. नेपाळ सध्या रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी) याने जयगड पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानूसार, मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. तुलसीदास हिने राहत्या घरी पाणी समजून सॅनिटायझरचे प्राशन केले.

शक्तिप्रदर्शन होणार, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके आज अर्ज भरणार
यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने पतीने तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेची जयगड पोलीस ठाण्यात आकिस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर धातकर करत आहेत.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here