Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Oct 2022, 8:48 am
Pune News : फरासखाना हद्दीत असलेला पुण्यातील बुधवार पेठ रेड लाईट एरिया मधून मागच्या सहा महिन्यात एका सराईत चोराने तब्बल १७ दुचाकी लांबवल्या आहेत. दरम्यान, एवढी मोठी चोरी करणाऱ्या चोराला अखेर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

हायलाइट्स:
- चोराची कमाल चोरी करायचा फक्त रेड लाईट एरियामध्ये
- तब्बल १७ दुचाकींची केली चोरी
- पुण्यातील चोराची कमाल
फरासखाना हद्दीत गेल्या सहा महिन्यात दुचाकी चोरी करण्याचं प्रमाण वाढलं होतं. खास करुन रेड लाईट एरियामध्ये दुचाकी चोरण्याच प्रमाण वाढलं असताना चोरी झालेले भागातले सीसीटीव्ही तपासणी केली असताना एक संशयीत इसम दाणे आळी येथे गाडी घेऊन जाताना दिसला. हा इसम चोरी करणाऱ्या व्यक्तीसारखा दिसत होता. त्याची थांबून चौकशी केली विचारपूस केली असता तो बोलायला लडखडला. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी करत असताना तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागला. त्याच्याकडे असलेल्या गाडीबाबत अधिक माहिती घेत असताना सदर दुचाकी चोरी झाल्याची नोंद फरासखाना पोलीस ठाण्यात होती. संशय पक्का झाल्याने तपास अधिकारी पोलीस ना. वैभव स्वामी, पोलीस ना. प्रवीण पासलकर, पोलीस ना. सुमित खुट्टे यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने गाडी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी अधिक तपास केला असताना तो रेड लाइट एरिया मध्ये फिरण्यासाठी रात्री फेर फटका मारायचा आणि गाड्यांवर नजर ठेवून मास्टर किल्लीने गाडी चालू करून तिथून पसार होत असायचा. अशा एकूण रेड लाईट एरिया मधून त्याने तब्बल १७ गाड्या चोरल्या होत्या आणि एक बाहेरून चोरली होती. या सगळ्या गाड्या त्याने देहू रोड येथे पार्क केल्या होत्या. या सगळ्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद करत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.