Maharashtra Politics | मुंबई महानगरपालिकेचे वकील अनिल साखरे यांनी एक गौप्यस्फोट केला होता. १२ ऑक्टोबरला ऋतुजा लटके यांच्याविरोधात Liaisoning म्हणजेच मध्यस्थाची भूमिका बजावल्याची एक तक्रार दाखल करण्यात आल्याचे पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. या आरोपांची चौकशी होईपर्यंत ऋतुजा लटके यांना राजीनामा देता येणार नाही, असेही पालिकेने म्हटले होते. ही तक्रार खोटी असल्याचा संशय.

हायलाइट्स:
- आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
- ऋतुजा लटके अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासंदर्भात उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मुंबई महानगरपालिकेचे वकील अनिल साखरे यांनी एक गौप्यस्फोट केला होता. १२ ऑक्टोबरला ऋतुजा लटके यांच्याविरोधात Liaisoning म्हणजेच मध्यस्थाची भूमिका बजावल्याची एक तक्रार दाखल करण्यात आल्याचे पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. या आरोपांची चौकशी होईपर्यंत ऋतुजा लटके यांना राजीनामा देता येणार नाही, असेही पालिकेने म्हटले होते. मात्र, ऋतुजा लटके यांच्याविरोधातील ही तक्रार खोटीच होती आणि लटकेंना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी ती मुद्दाम करण्यात आली होती का, ही शक्यता आता आणखी बळकट होताना दिसत आहे. कारण ज्या व्यक्तीने लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, तो व्यक्तीच प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहे किंवा नाही, याबाबत शंका आहे.
‘टीव्ही ९ मराठी’च्या वृत्तानुसार, ऋतुजा लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला तेव्हा त्या पत्त्यावर कोणीही आढळले नाही. ऋतुजा लटके यांच्याविरोधात रामलू चिनय्या या इसमाने Liaisoning ची तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अर्जावर रामलू चिनय्या याचा पत्ता अंधेरीतील होता. अंधेरीतील रामकुमार चाळीत तो वास्तव्याला असल्याचे तक्रार अर्जावर नमूद करण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी जाऊन शोध घेतला असता या परिसरात रामलू चिनय्या नावाची कोणतीही व्यक्तीच राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील स्थानिकांनाही रामूल चिनय्याबाबत विचारणा केल्यानतंर याठिकाणी असा कोणत्याही नावाचा व्यक्ती राहत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या एकूणच प्रकरणात संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.