Maharashtra Politics | आता मी अंधेरीत जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहे. मशाल हे चिन्ह आमच्यासाठी नवीन नाही. १९८५ साली छगन भुजबळ याच निशाणीवर निवडून आले होते. त्यामुळे मशाल आपल्यासाठी शुभ आहे. हे चिन्ह मिळाल्यामुळे आपल्याला लवकरच सकारात्मक बदल दिसतील, असे ऋतुला लटके यांनी म्हटले. आता मी शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ज्येष्ठ नेते ठरवतील त्याप्रमाणे प्रचार करेन.

हायलाइट्स:
- रमेश लटके यांचे नाव अंधेरी पूर्व विभागात सर्वांना माहिती होते
- माझा चेहरा मतदारांना तितकासा माहिती नाही
- मला मतदारसंघात थोडेफार फिरावे लागेल
आता मी अंधेरीत जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहे. मशाल हे चिन्ह आमच्यासाठी नवीन नाही. १९८५ साली छगन भुजबळ याच निशाणीवर निवडून आले होते. त्यामुळे मशाल आपल्यासाठी शुभ आहे. हे चिन्ह मिळाल्यामुळे आपल्याला लवकरच सकारात्मक बदल दिसतील, असे ऋतुला लटके यांनी म्हटले. आता मी शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ज्येष्ठ नेते ठरवतील त्याप्रमाणे प्रचार करेन. माझे पती रमेश लटके यांचे नाव अंधेरी पूर्व विभागात सर्वांना माहिती होते. परंतु, माझा चेहरा मतदारांना तितकासा माहिती नाही. त्यामुळे मला मतदारसंघात थोडेफार फिरावे लागेल. त्यासाठी ज्येष्ठ नेते ठरवतील त्याप्रमाणे मी शिवसैनिकांसोबत मतदारसंघात फिरेन. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे, याचा मला आनंद आहे, असे ऋतुजा लटके यांनी सांगितले.

आता ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सुमारास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत ऋतुजा लटके आपला उमेदवारी अर्ज भरतील. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल हेदेखील आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित राहतील. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. ६ नोव्हेंबर रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
पोटनिवडणुकीच्या रिंगणात आणखी तीन उमेदवार
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गुरुवारपर्यंत एकूण ३ जणांनी अर्ज दाखल केले आहे. हिंदुस्थान जनता पार्टीचे राकेश विश्वनाथ अरोरा, अपक्ष म्हणून मिलिंद काशिनाथ कांबळे, अपक्ष म्हणून नीना गणपत खेडेकर यांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.