नगर: जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ७२ बाधित रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता १ हजार ३५ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यामध्ये १२ मार्च रोजी पहिला करोना बाधित आढळला होता. तर, सोमवार, १३ जुलै म्हणजेच जवळपास चार महिन्यानंतर करोना रुग्णसंख्या ही एक हजाराच्या पुढे गेली आहे. ( )

वाचा:

नगर जिल्ह्यात १२ मार्च रोजी पहिला करोना बाधित आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे सातत्याने परिस्थितीचा विविध यंत्रणांकडून आढावा घेत होते. त्यामुळे करोना नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले होते. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या १३१ होती. त्यानंतर मात्र नगरमध्ये , , औरंगाबाद, नाशिक अशा रेड झोनमधून येणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे करोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली होती. ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४६५ झाली होती. जुलै महिन्यात मात्र करोना प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. नगर शहरातील दाटवस्तीत करोनाचा शिरकाव झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज ५० पेक्षा जास्त बाधितांची भर एकूण रुग्णसंख्येत पडत आहे. सोमवारीही नगर जिल्ह्यात तब्बल ७२ करोना बाधित वाढले असून आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ही १ हजार ३५ झाली आहे. म्हणजेच जुलै महिन्यातील १३ दिवसांमध्ये तब्बल ५७० बाधित आढळले आहेत.

वाचा:

दरम्यान, आता नगर शहरामध्ये करोनाचा फैलाव वेगाने होऊ लागल्यामुळे तो रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. नगर शहरातील महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यालाही करोनाची लागण झाली आहे. सध्या नगर शहरामध्ये तोफखाना, सिद्धार्थनगर, लक्ष्मीकारंजा, पद्मानगर, भिस्तबाग, बागरोजा हडको, नंदनवन कॉलनी (बुरुडगाव रोड) हे सात कंटेन्मेंट झोन आहेत. रुग्णसंख्येचा वाढता वेग पाहता संपूर्ण बाबत सुद्धा प्रशासनाने विचार सुरू केला आहे.

वाचा:

दृष्टीक्षेपात नगर जिल्ह्यातील स्थितीः

जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्ण – १ हजार ३५

करोनामुक्त झालेले रुग्ण – ६४९

करोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण – २६

उपचार सुरू असलेले रुग्ण – ३६०

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here