मयत डॉक्टर सतीश देशमुख याची ही दुसरी पत्नी असून तिच्या प्रियकरासोबत प्रेमात अडसर ठरणाऱ्या डॉक्टर पतीला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर देशमुख यांचे सुहासिनीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्यांच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी डॉक्टर देशमुख यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा वर्षे कारागृहात शिक्षा भोगली आहे.
दरम्यान, सुहासिनी देशमुख आणि अरुण कांडेकर असे या प्रकरणातील संशयित आरोपींची नावं असून दोघेही सध्या फरार आहेत. डॉक्टर देशमुख यांच्या खाजगी रुग्णालयात म्हणजेच परीक्षेत हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडला होता. सुहासिनी देशमुख आणि तिचा प्रियकर अरुण कांडेकर हे दोघेही १० सप्टेंबर रोजी रुग्णालयात असताना डॉक्टर देशमुख यांनी या दोघांच्या प्रेम संबंधाबाबत विचारणा केली होती. त्यानंतर या तिघांमध्ये जोरदार वाद झाला होता. वादानंतर रुग्णालयातून प्रियकर निघून गेला.
रुग्णालयातच असलेल्या विश्रांती कक्षात जाऊन डॉक्टर पतीला संशयित सुहासिनी तिने मुलीचे इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर देशमुख यांची दुसरी पत्नी सुहासिनी तिने डॉक्टर देशमुख कारागृहात शिक्षा भोगत असताना दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केला होता. त्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. डॉक्टर देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांसह ते राहत होते .
सुवासिनी ही डॉक्टर देशमुख यांच्याकडे उपचार घेण्यासाठी आल्यानंतर डॉक्टर देशमुख आणि सुहासिनी पुन्हा एकत्र आले. डॉक्टर देशमुख सुहासिनी आणि अरुण यांच्या प्रेमात अडसर ठरत असल्याने डॉक्टर सतीश देशमुख यांना मुलीचे इंजेक्शन देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न त्यावेळी यशस्वी झाला. डॉक्टर देशमुख यांच्यावर मागच्या गेल्या ३२ दिवसांपासून उपचार सुरू होता. अखेर काल डॉक्टर सतीश केशवराव देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.