मुंबई : महाराष्ट्रात यंदाच्या पावसानं आता परतीचा मार्ग धरला आहे. परतीच्या पावसामुळे राज्यभरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात आता आजपासून पाऊस ओसरण्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रमध्ये परतीच्या पावसानं हाहाकार माजवला. यामुळे शेतीला मोठा फटका बसला. अनेक पिकांचे नुकसान झालं. अशात आता परतीचा पाऊसही चांगलाच बरसणार असल्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.