Maharashtra Politics | ऋतुजा लटके यांनी शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नीचे उदाहरण लक्षात ठेवावे. बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी तृप्ती सावंत विजयी झाल्या. मात्र, पोटनिवडणूक संपल्यानंतर तृप्ती सावंत यांना मातोश्रीवर प्रवेशही दिला जात नव्हता. हेच ऋतुजा लटके ताईंसोबत होऊ शकते, याची जाणीव त्यांना असायला हवी.

 

Nitesh Rane Uddhav Thackeray
नितेश राणे आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • मातोश्रीवर माझे फोन उचलले जात नाहीत
  • मी आणि रमेश लटके आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जात होतो
  • रमेश लटके यांनी मला सर्वकाही सांगितले होते
मुंबई: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या लढाईमुळे शिवसेना (उबाठा) आणि भाजपमधील वातावरण आता खऱ्या अर्थाने तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते मुरजी पटेल यांनी शुक्रवारी अंधेरीत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुरजी पटेल यांच्या या शक्तीप्रदर्शनात भाजपचे अनेक प्रमुख नेते सामील झाले होते. यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. रमेश लटके (Ramesh Latke) हे जिवंत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
Andheri Bypoll: राजीनाम्याचं पत्रं हातात पडताच ऋजुता लटकेंचा एल्गार, आयुक्तांना लगावला टोला
मी आणि रमेश लटके आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जात होतो. त्यावेळी विमानात रमेश लटके यांनी मला सर्वकाही सांगितले होते. उद्धव ठाकरे मला भेटत नाहीत. मातोश्रीवर माझे फोन उचलले जात नाहीत. यामुळे रमेश लटके यांना प्रचंड मानसिक यातना सहन कराव्या लागल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. ऋतुजा लटके यांनी शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नीचे उदाहरण लक्षात ठेवावे. बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी तृप्ती सावंत विजयी झाल्या. मात्र, पोटनिवडणूक संपल्यानंतर तृप्ती सावंत यांना मातोश्रीवर प्रवेशही दिला जात नव्हता. हेच ऋतुजा लटके ताईंसोबत होऊ शकते, याची जाणीव त्यांना असायला हवी, असे नितेश राणे यांनी म्हटले. या आरोपांना आता शिवसेनेकडून (उबाठा) काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
Andheri Bypoll: ऋतुजा लटके यांच्याविरोधात तक्रार करणारा अंधेरीचा रामलू चिनय्या अस्तित्त्वातच नाही का?
दरम्यान, नितेश राणे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपच्या मुरजी पटेल यांचाच विजय होईल, असा दावा केला. मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरायला इतके लोक आहेत, हीच त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावती आहे. लोकांमध्ये २४ तास काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपने संधी दिली आहे. मला विश्वास आहे की, आता जसं वातावरण आहे, तसेच वातावरण निकालावेळीही असेल. मुरजी पटेल हे मोठ्या फरकाने निवडून येतील, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

ऋतुजा लटकेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज शिवसेनेच्या (उबाठा) ऋतुजा लटकेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यानिमित्ताने ऋतुजा लटकेही यांनीही अंधेरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे जातीने उपस्थित होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here