नवी दिल्लीः काँग्रेस नेते यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने राजस्थानमधील गहलोत सरकार गोत्या आले आहे. गहलोत यांनी सोमवारी आपल्या निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा गहलोत यांच्या गटाने केला. पण गहलोत सरकारला फक्त ८४ आमदारांचाच पाठिंबा असल्याचा दावा सचिन पायलट यांच्या गटाने केला आहे. सत्तेच्या डावपेचात सचिन पायलट यांच्या कार्यालयाकडून एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यावरू आता गहलोत आणि पायलट गटात ‘व्हिडिओ वॉर’ला तोंड फुटले आहे.

मंगळवारच्या बैठकीला येणार नाहीः सचिन पायलट

काँग्रेसने सोमवारी मुख्यमंत्री गहलोत यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी बंडखोर नेते सचिन पायलट यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. पण त्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला. सोमवारी राजस्थान आणि दिल्लीत काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली झाल्या. यानंतर रात्री काँग्रेसने मंगळवारी पुन्हा आमदारांची बैठक बोलावली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुन्हा काँग्रेसने सचिन पायलट यांना आमंत्रण दिले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट यांना चर्चेचे आवाहन केले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे तुमचं म्हणणं ऐकण्यास तयार आहेत, असंही ते म्हणाले. चर्चेतून वादावर तोडगा काढू असं सांगत सुरजेवाला यांनी मंगळवारच्या बैठकीसाठी सचिन पायलट यांना आमंत्रण दिलं आहे. पण बंडखोर नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचे आवाहन फेटाळून लावले आहे. आपण या बैठकीला उपस्थित राहणार नाही, असं सचिन पायलट यांनी स्पष्ट केलंय.

सचिन पायलट समर्थक आमदारांचा व्हिडिओ

काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या ऑफिसने समर्थक आमदारांचा एक व्हिडिओ मीडियाला शेअर केला. राजस्थानमधील काँग्रेस आमदार इंदर राज गुर्जर, पी.आर. मीणा, जी.आर. खताना आणि हरीश मीणा यांच्यासह इतर आमदार दिसत आहेत. हे पायलट यांचे समर्थक आमदार आहेत. हे आमदार हरयाणातील एका हॉटेलच्या आवारातला हा व्हिडिओ आहे.

गहलोत गटातील आमदारांचा व्हिडिओ

सचिन पायलट यांच्या गटाने समर्थक आमदारांचा व्हिडिओ जारी केल्यानंतर मुख्यमंत्री गहलोत गटानेही व्हिडिओ शेअर केला आहे. प्रताप सिंह खचारियावास, रघु शर्मा, गोविंद सिंह दोतसरा या मंत्र्यांसह काही आमदारही या व्हिडिओत दिसत आहेत. हे सर्व आमदार गहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला सोमवारी उपस्थित होते. राजस्थानमधील एका हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here