Bhandara News : शुक्रवारी बराच वेळ घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती-पत्नी मृतावस्थेत पडलेले आढळून आले.

हायलाइट्स:
- झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृण हत्या
- दोघांचीही झोपेत असताना गळा चिरुन हत्या
- भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील घटना
सुशील बोरकर (वय ४६ वर्ष) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. गुरुवारी रात्री बोरकर कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते. तर शेचारच्या खोलीत त्यांचे दोन मुलं झोपले होते. याचवेळी हा सर्व थरार घडला.
आज सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले. दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.