मुंबई: सिनेसृष्टीत करोनाची दहशत वाढत चालली असून आता अभिनेत्री सारा अली खानच्या अवतीभवतीही संकट घोंगावू लागलं आहे. साराच्या कारचालकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून याबाबत तिनेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ( )

वाचा:

हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत तपशील दिला आहे. आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत महापालिकेला तातडीने कळवण्यात आले. त्यानंतर पालिकेने संबधित ड्रायव्हरला विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. चालकासह मी, माझे कुटुंबीय आणि अन्य स्टाफ या सर्वांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात आमचे सगळ्यांचे चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीही आम्ही आवश्यक सर्व काळजी घेत आहोत, असेही साराने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये नमूद केले आहे.

वाचा:

साराने मुंबई पालिकेचेही आभार मानले आहेत. पालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला तत्परतेने साह्य केले. नियमावलीही समजावून सांगितली. त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त कर असून सर्वांनीच आपली काळजी घ्यावी, अशी ही वेळ असल्याचेही साराने पुढे म्हटले आहे.

दरम्यान, सध्याच्या आघाडीच्या नायिकांमध्ये साराने स्थान मिळवले असून लवकरच तिचा ‘कुली नंबर १’ चित्रपट येणार आहे. करोना संकटामुळे या चित्रपटाच्या चित्रिकरणाला ब्रेक लागला आहे.

वाचा:

यांच्यासाठी देशभरात प्रार्थना

बॉलिवूडमध्ये अचानक करोनाची दहशत पसरली आहे. प्रथम अभिनेत्री यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षकाला करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बंगल्याचा काही भाग सील करण्यात आला. त्यापाठोपाठ महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरात करोनाने शिरकाव केला. अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि सर्वत्र खळबळ उडाली. अमिताभ व बच्चन कुटुंबाला लवकरात लवकर स्वास्थ्य लाभावे म्हणून देशभरात प्रार्थना केली जात आहे. बच्चन कुटुंबानंतर अभिनेता अनुपम खेर यांच्या घरातही करोनाने शिरकाव केला. अनुपम खेर यांचा अहवाल निगेटिव्ह आला मात्र त्यांची आई, भाऊ आणि वहिनी यांना करोनाची लागण झाली. मालिकांची सेटवरही करोना पोहचला आहे. ‘कसौटी जिंदगी की’ फेम पार्थ समथानचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मालिकेचं शूटिंग तडकाफडकी रोखण्यात आलं आहे. टीममधील इतर सदस्यांचीही आता करोना चाचणी करण्यात येणार आहे. ‘उंगली’ फेम अभिनेत्री रेचल वाइटलाही करोनाची लागण झाली आहे. बालाजी टेलिफिल्म्सची कार्यकारी उपाध्यक्ष तनुश्री दासगुप्ता यांनाही करोनाची लागण झाली आहे.

पाहा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here