पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख यांचे ज्येष्ठ पुत्र आणि बिहार सरकारमधील पर्यावरण आणि वनमंत्री तेज प्रताप यादव हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी आणखी एक दावा केला आहे. तेज प्रताप यादव यांनी आपल्यासोबत चमत्कार घडल्याचे म्हटले आहे. तेज प्रताप यांच्या म्हणण्यानुसार, साईबाबांना मनापासून स्मरण केल्यावर त्यांनी असा चमत्कार पाहिला जो आजपर्यंत त्यांच्यासोबत कधीच घडला नव्हता.

तेज प्रताप यादव म्हणाले की, मी रात्री ‘शिर्डीवाले साईबाबा’ची मालिका पाहत होतो. यावेळी त्यांना साईबाबांचे स्मरण झाले आणि त्यांना वाटले की त्यांनाही बाबांची विभूती मिळावी. तेज प्रतापच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या टेबलावर विभूतीचे एक पॅकेट सापडले. तेज प्रताप म्हणाले की, असा चमत्कार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तेज प्रताप हा दावा करताना दिसत आहेत. तेज प्रताप म्हणाले की, त्यांना साईबाबा, भगवान श्रीकृष्ण, महादेव आणि इतर देवतांचा आशीर्वाद आहे. त्याने व्हिडिओमध्ये काय म्हटले ते तुम्हीच बघा…

तेज प्रतापच्या पूजेपूर्वीच पूजेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. काही वर्षांपूर्वी भगवान शंकर आणि श्रीकृष्णाचे रूप धारण करतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. तेज प्रताप विशेषतः वृंदावनला जात असतात. ते बासरी वाजवायलाही शिकले असल्याचं बोललं जातं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here