पाकिस्तानच्या मुलतानमधील एका रुग्णालयात ५०० हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. रुग्णालयात बेवारस स्थितीत मृतदेह सापडले. या प्रकरणाची नोंद प्रशासनानं घेतली असून तपास सुरू केला आहे.

रुग्णालयात आढळून आलेल्या मृतदेहांचा तपास करून त्याचा चौकशी अहवाल तीन दिवसांत सादर करा. या प्रकरणाचा तपास तातडीनं आणि प्राधान्यानं करा, अशा सूचना पत्रातून देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. निश्तार रुग्णालयातील मृतदेह नीट न हाताळल्याप्रकरणाची चौकशी दक्षिण पंजाबच्या आरोग्य विभागानं सुरू केली आहे. त्यासाठी सहा सदस्यीय टीम तयार करण्यात आली आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.