वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी सप्टेंबरमधील घाऊक महागाई (Wholesale Inflation) ची आकडेवारी जाहीर केली. यानुसार, सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईत सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. खाद्यपदार्थ आणि उत्पादित वस्तूंच्या किमती घटल्यामुळे सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई कमी राहिली आहे. मात्र, सलग १८ व्या महिन्यात घाऊक महागाई दुहेरी अंकात राहिली आहे. या वर्षी मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (WPI) १५.८८ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.
मागील महिन्याच्या तुलनेत खाद्यपदार्थांच्या घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमध्ये ९.९३टक्क्यांवरून ८.०८ टक्क्यांवर आला आहे. त्याचवेळी, प्राथमिक वस्तूंच्या घाऊक महागाईचा दर ऑगस्टमध्ये १४.९३ टक्क्यांवरून ११.७३ टक्क्यांवर आला आहे. सप्टेंबरमध्ये इंधन आणि उर्जेचा दर ३३.६७ टक्क्यांवरून ३२.६१ टक्क्यांवर घसरला. त्याच वेळी उत्पादन क्षेत्रातील महागाई दर महिन्याच्या आधारावर ७.५१ टक्क्यांवरून ६.३४ टक्क्यांवर आली आहे.
सप्टेंबरमध्ये बटाट्याच्या घाऊक महागाईचा दर ऑगस्टमधील ४३.५६ टक्क्यांवरून ४९.७९ टक्क्यांवर आला आहे. त्याच वेळी कांद्याचा महागाई दर -२४.७६ टक्क्यांवरून -२०.९६ टक्के झाला आहे. अंडी, मांस आणि मासे यांचा WPI ऑगस्टमधील ७.८८ टक्क्यांवरून ३.६३ टक्क्यांवर आला आहे. भाज्यांची घाऊक महागाई दर महिन्याच्या आधारावर २२.३ टक्क्यांवरून सप्टेंबर २०२२ मध्ये ३९.६६ टक्क्यांवर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत सर्व वस्तू निर्देशांक ०.६५ टक्क्यांनी घसरले. प्राथमिक वस्तू निर्देशांक १.३४ टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे इंधन आणि उर्जा निर्देशांकात ०.१३3 टक्क्यांची वाढ दिसून आली. सप्टेंबरमध्ये उत्पादन उत्पादन निर्देशांक ०.४९ टक्क्यांनी घसरला.
किरकोळ महागाईत वाढ
सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई ७.४१ टक्क्यांपर्यंत वाढली. सलग नवव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेपेक्षा किरकोळ महागाई जास्त आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये अन्नधान्य महागाई ८.६० टक्के झाली. ऑगस्टमध्ये हा आकडा ७.६२ टक्के होता.
महागाई नियंत्रणात येत नसल्याने आरबीआयने या वर्षी आतापर्यंत चार वेळा रेपो दर १.९० टक्क्याने वाढवला आहे. मात्र, तरीही महागाई नियंत्रणात नाही. रिझव्र्ह बँक कायद्यांतर्गत, सलग तीन तिमाहीत महागाईचे उद्दिष्ट गाठले गेले नाही, तर रिझव्र्ह बँकेने केंद्र सरकारला त्याचे कारण आणि महागाई रोखण्यासाठी उचललेल्या पावलांची तपशीलवार माहिती देणे आवश्यक आहे.