परभणी : पालम तालुक्यातील बनवस येथे विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या छोट्या भावाचा मोटारसायकल अपघात जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार १० ऑक्टोबरला दुपारी घडली. सोमवारी रात्री उशिरा छोट्या भावावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर मंगळवार ११ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता धानोरा काळे येथील गोदावरी नदीच्या पात्रात अस्थिविसर्जन करुन आलेल्या मोठ्या भावाने बुधवार १२ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता छोट्या भावाचे मृत्युचे दु: ख सहन न झाल्याने त्यांनी देखील आपला प्राण सोडला. या दोन्ही घटना दोन दिवसात घडल्याने माने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या काळात सख्खे भाऊ विविध कारणांमुळे वैरी बनले असल्याचे दिसून येते. परंतु आजही अनेक सख्खे भाऊ एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असल्याचं देखील उदाहरण समाजात आहेत. ताडकळस येथील आबाजी माने यांचे २५ ते ३० वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांना किशन माने, दत्ता माने, माधव माने, राम माने असे चार मुले व शांताबाई हरिभाऊ होनमणे ही एकुलती एक बहीण असा परिवार आहे. वडिलांच्या निधनानंतर चारही भाऊ जिव्हाळ्याने राहत होते. यापैकी सर्वात छोटा भाऊ राम व त्यांच्याहून मोठा असलेला माधव यांच्यात अतिप्रेम होते.

Aurangabad : संजय शिरसाट नाराज, येत्या काळात त्यांना मंत्रीपद मिळेल का?, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…
सोमवार १० ऑक्टोबरला सर्वात छोटा असलेला राम आबाजी माने (वय ३५) हे पालम तालुक्यातील बनवस येथे नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी पत्नी, मुलाबाळांना सोबत घेऊन मोटारसायकलवर गेले होते. परंतु बनवसजवळ मोटारसायकलचा अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करुन मंगळवारी रीतीरिवाजांप्रमाणे धानोरा काळे येथील गोदावरी नदीच्या पात्रात माधव माने यांनी अस्थिविसर्जन केले.

छोट्या भावाचा अचानक मृत्यू झाल्याने मोठ्या भावाच्या मनावर मोठा आघात झाला. या दु:खाच्या विरहाने माधव माने यांना बुधवार १२ ऑक्टोबरला त्यांनी देखील आपला प्राण सोडला. या दोन्ही दुर्दैवी घटनांमूळे माने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला असून व ताडकळस येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, २ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे.

Karwa Chauth Inside Photo: अनिल कूपरच्या घरी Bollywood Wivesचं जोरदार करवा चौथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here