Maharashtra Politics | रमेश लटके हे अंधेरी पूर्व मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिले होते. पूर्वी काँग्रेसचा गड असलेला हा परिसर रमेश लटके यांनी शिवसेनेकड खेचून आणला होता. रवींद्र वायकर यांच्या विश्लेषणानुसार, अंधेरी पूर्व परिसरात शिवसेनेची ३१ टक्के, काँग्रेस २८ टक्के आणि भाजपची २५ टक्के मतं आहेत. उर्वरित १४ टक्के मतं ही मनसे आणि इतर पक्षांची आहेत.

हायलाइट्स:
- भाजप उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार
- रवींद्र वायकराचं महत्त्वाचं भाकीत
रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ त्यांच्याच मतदारसंघाला लागून आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीची सर्व जबाबदारी वायकर यांच्यावर सोपवल्याचे सांगितले जाते. सध्या अंधेरी विभागाचे प्रमुख असलेले अनिल परब हे पत्रकारपरिषदा आणि कायदेशीर बाबींविषयी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिसत असले तरी पडद्यामागून रवींद्र वायकर अंधेरी पोटनिवडणुकीची सर्व सूत्रं हाताळत असल्याचे सांगितले जाते. याच रवींद्र वायकर यांनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतं घेऊन निवडून येतील, असा दावा केला आहे.
रमेश लटके हे अंधेरी पूर्व मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिले होते. पूर्वी काँग्रेसचा गड असलेला हा परिसर रमेश लटके यांनी शिवसेनेकड खेचून आणला होता. रवींद्र वायकर यांच्या विश्लेषणानुसार, अंधेरी पूर्व परिसरात शिवसेनेची ३१ टक्के, काँग्रेस २८ टक्के आणि भाजपची २५ टक्के मतं आहेत. उर्वरित १४ टक्के मतं ही मनसे आणि इतर पक्षांची आहेत. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या निधनामुळे सहानुभूतीचा फॅक्टर हा ऋतुजा लटके यांच्या बाजूने आहे. या सगळ्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना एकूण मतांपैकी तब्बल ६५ टक्के मतं मिळतील, असा दावा रवींद्र वायकर यांनी केला आहे. येत्या ३ ऑक्टोबरला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. तर ६ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होती. त्यामुळे आता रवींद्र वायकर यांचा दावा कितपत खरा ठरणार, हे पाहावे लागेल.
मी ऋतुजा लटकेंना ३० हजारांच्या मताधिक्याने हरवेन: मुरजी पटेल
भाजपच्या मुरजी पटेली यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत आपण ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा ३० हजारांच्या मताधिक्याने पराभव करु, असा दावा केला आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय हे पक्ष माझ्या पाठिशी आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मी अपक्ष म्हणून ४८ हजार मते मिळवली होती. आता तर मला भाजप पक्षाचा अधिकृत पाठिंबा आहे, याशिवाय इतर पक्षही माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी तब्बल ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल, असा दावा मुरजी पटेल यांनी केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.