विक्रमी उच्चांकावरून ५३% तुटली किंमत
नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नायकच्या शेअरची किंमत २,५७४ च्या विक्रमी उच्चांकावरून ५३ टक्क्यांनी खाली घसरली आहे. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर २०२१ रोजी नायकाचे शेअर बाजारात लिस्ट झाले होते. तर सध्या Nykaa त्याच्या १,१२५ रुपये प्रति शेअर या इश्यू किमतीपेक्षा ७ टक्क्यांनी जास्त ट्रेडिंग करत आहे.
कंपनी बोनस शेअर्स देणार
नायकाने अलीकडेच ३ ऑक्टोबर रोजी ५:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स मंजूर केले होते, म्हणजे कंपनीमध्ये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी पाच बोनस शेअर्स दिले जातील. तेव्हापासून हा शेअर सुमारे ८ टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय नायकाने गेल्या तीन महिन्यांत S&P बीएसई सेन्सेक्समध्ये ९ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत १५ टक्क्यांच्या घसरणीसह बाजारात निराशाजनक कामगिरी केली आहे. १० नोव्हेंबर २०२१ रोजी जेव्हा कंपनी प्रथमच स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाली, तेव्हा समभागाने गुंतवणूकदारांना आयपीओ किंमतीतून बंपर परतावा दिला होता. नायकाचा ११२५ रुपयांचा शेअर २५७३ रुपयांवर पोहोचला होता. मात्र, नंतर प्रॉफिट बुकींगमुळे स्टॉक खाली घसरला.
सध्या स्टॉक त्याच्या उच्चांकावरून ५३ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तसेच समभाग त्याच्या आयपीओ किमतीपेक्षा ६ टक्क्यांनी १२०० रुपयांच्या आसपास व्यापार करत आहे. याशिवाय नायकाचे मार्केट कॅप जे १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते ते आता ५७,०४० कोटी रुपयांवर आले आहे. ऑक्टोबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच या महिन्यात, Nykaa ने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्डाने बोनस शेअर्स मिळण्यास पात्र असलेल्या भागधारकांसाठी गुरुवार, ३ नोव्हेंबर २०२२ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. आणि दोन महिन्यांच्या आत म्हणजे २ डिसेंबर २०२२ पर्यंत शेअरधारकांना बोनस शेअर्स जारी केले जातील.