नवी दिल्ली: गेल्या महिन्यात नामिबियाहून भारतात चित्ते आणण्यात आले. नामिबियाहून आणलेले ८ चित्ते मध्य प्रदेशची राजधानी कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आले. नामिबियानं भारताला चित्ते भेट दिले. त्यासाठी भारत सरकारसोबत एक करार करण्यात आला. भारत जैवविविधता क्षेत्रात काम करेल आणि या मुद्द्यांवर CITESच्या बैठकीतही सहमती जाहीर करेल, असे मुद्दे या करारात होते. नामिबियानं भारताला चित्ते दिले. ते देताना दोन देशांमध्ये करार झाला. त्यातील अटींची पूर्तता आता भारताला करावी लागेल.

दोन्ही देशांमधील करारात हस्तीदंत हा शब्दाचा वापर करण्यात आलेला नाही. मात्र नामिबियानं CITESच्या अंतर्गत हस्तीदंताच्या व्यापाराबद्दल भारताचा पाठिंबा मागितला आहे. नामिबिया, बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये हस्तीदंताचा व्यापार चालतो. १९८० पासून भारतानं हस्तीदंताचा व्यापार बंद केला आहे. या व्यापारावरच बंदी आणण्यात आली आहे. मात्र नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या CITESच्या बैठकीत भारत आपली भूमिका बदलू शकतो. भारत नामिबियानं दिलेल्या चित्त्यांच्या बदल्यात त्यांच्या बाजूनं निर्णय घेऊ शकतो.
भयानक VIDEO; स्ट्रेचरचा निम्मा भाग आत गेला अन् अचानक रुग्णासह लिफ्ट खाली गेली अन् मग…
CITESची बैठक पुढील महिन्यात मध्य अमेरिकेतील पनामात होत आहे. या बैठकीत भारत हस्तीदंताच्या व्यापाराबद्दल नेमकी काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ‘नामिबिया आणि इतर देशांमध्ये हस्तीदंताचा व्यापार केला जातो. यासाठी आम्ही भारताचं सहकार्य मागितलं आहे. सामंजस्य कराराच्या अंतर्गत हे करण्यात येत आहे. भारतानं आमची साथ दिल्यास आमची बाजू आणखी मजबूत होईल’, असं नामिबियाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकारी रोमियो मुयुन्डा यांनी सांगितलं.
आम्ही पेटवून घेतोय! जोडप्यानं अंगावर पेट्रोल ओतलं, महिलेनं माचिस पेटवली; तितक्यात…
भारतानं हस्तीदंत व्यापाराबद्दल आपली भूमिका बदलल्यास १९९० च्या दशकात घेतलेल्या निर्णयानंतर हा एक महत्त्वपूर्ण बदल मानण्यात येईल, असं नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचे सदस्य रमन सुकुमार म्हणाले. त्यावेळी भारतानं हस्तिदंताच्या व्यापारावर बंदी घातली होती. दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये हत्तींची संख्या अधिक आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थांना हस्तीदंतांच्या व्यापारामुळे बराच फायदा होतो, असं सुकुमार यांनी सांगितलं.

पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नामिबियाचे उपपंतप्रधान नेटुंबो नंदी-नदैतवाह यांच्यासोबत एका सामंजस्य करारावर २० जुलैला स्वाक्षरी केली. याच करारानंतर भारतात चित्ते आणण्यात आले. हा करार ऐतिहासिक असल्याचं यादव म्हणाले होते. दोन्ही सरकारांनी करार सार्वजनिक केला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here