नवी दिल्ली : विश्वचषकाला काही दिवस शिल्लक असताना आता पाकिस्तानने मोठा गेम केला आहे. कारण भारतासाठी कर्दनकाळ ठरलेल्या खेळाडूला त्यांनी थेट पाकिस्तानच्या संघात अखेरच्या क्षणी स्थान दिले आहे. आज विश्वचषकासाठी संघांतील बदल जाहीर करण्याची अखेरची तारीख होती. ही संधी साधत पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आता मोठा गेम केला आहे.

पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. पण आता पाकिस्तानच्या संघात एक मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानच्या १५ सदस्यीय संघातून उस्मान कादिरला वगळण्यात आले आहे तर त्याच्या जागी फखर जमानचा समावेश करण्यात आला आहे, जो मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाज आहे. फखर झमान हा भारतासाठी एकेकाळी कर्दनकाळ ठरला होता. कारण चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला नमवले होते. त्यावेळी झमानने दमदार शतकी खेळी साकारली होती आणि या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला होता. झमान सध्या चांगल्या फॉर्मात नसला तरी या संचिताच्या जोरावर त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.

फखर जमानला विश्वचषक संघात स्थान मिळाले
पाकिस्तानने यापूर्वी टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर केला होता तेव्हा फखर जमानला १५ जणांच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते, पण आता तो या संघात परतला आहे. खरं तर, पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत असताना लेगस्पिनर उस्मान कादिरच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. यानंतर तो न्यूझीलंडमधील तिरंगी मालिकेत भाग घेऊ शकला नाही. उस्मान कादिर टी-२० विश्वचषकापर्यंत बरा होऊन येथे खेळेल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता अधिकृतपणे उस्मान कादिरच्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

फखर जमान लवकरच पाकिस्तान संघात सामील होणार असून तो सराव सामन्यापूर्वी निवडीसाठी उपलब्ध असेल. पाकिस्तान १७ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध आणि १९ ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सामन्यांनंतर, पाकिस्तान बाबर आझमच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली गुरुवारी न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने अंतिम सामन्यात किवी संघाचा ५ गडी राखून पराभव केला आणि ही मालिका जिंकली आहे.

टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघबाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here