नवी दिल्ली: बँक कर्मचारी संघटनांनी पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यात केलेल्या बदलाची भरपाई करण्यासाठी कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कर्मचाऱ्यांना आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळावी, ज्यासाठी ते दररोज (५ दिवस) ३० मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार असल्याचं ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (AIBEA)ने म्हटले आहे. त्यासाठी सकाळी काम सुरू करण्याची वेळ ३० मिनिटे आधी करता येईल, असे ते सांगतात. याशिवाय ग्राहक सेवा किंवा नॉन-कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये दररोज ३० मिनिटांनी वाढ करण्याचाही प्रस्ताव आहे.

प्रस्तावित योजनेनुसार बँकेचे कामकाज सकाळी ९.४५ ऐवजी ९.१५ वाजता सुरू होईल आणि नियोजित वेळेनुसार ४.४५ वाजेपर्यंत सुरू राहील. याशिवाय रोख व्यवहारांची वेळ ९.३०-१.३० आणि नंतर २ ते ३.३० पर्यंत वाढवली जाईल. त्याचवेळी, नॉन-कॅश व्यवहार ३.३० ते दुपारी ४.४५ वाजेपर्यंत होतील.

काळ्या पैशाला बसणार चाप; स्विस बँकेतील रकमेसह ठेवीदारांची नावं जाहीर होणार
सध्या बँक कर्मचारी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टीवर असतात. पण कर्मचाऱ्यांची मागणी मान्य झाल्यास त्यांना दररोज ७.३० तास काम करावे लागणार आहे. याप्रमाणे ग्राहकांना देखील आपल्या कामाचे निराकरण करण्यासाठी अतिरिक्त अर्धा तास मिळेल, मात्र जे शनिवारी आपले काम पूर्ण करायचे, त्यांना अडचण होऊ शकते.

महागड्या व्याजदराने हैराण झालात; जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त कर्ज
पहिली मागणी फेटाळण्यात आली
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) सरचिटणीस सी.एच. वेंकटचलम यांनी सांगितले की, ते पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची अनेक दिवसांपासून मागणी करत होते पण इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) ते मंजूर केले नाही. ते म्हणाले की LIC ला गेल्या वर्षी मान्यता मिळाली तेव्हा ही मागणी पुन्हा एकदा उठवली गेली आणि यावेळी आयबीएने दुसऱ्या शनिवारी केलेल्या कमी कामाची भरपाई कशी होणार असे विचारले.

ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याचं सुट्ट्या! तब्बल २१ दिवस बँकांना टाळं, तीन दिवस शेअर बाजारही बंद
व्यंकटचलम म्हणाले, “आम्ही कामाचा वेळ दररोज ३० मिनिटांनी वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. आम्हाला आशा आहे की IBA, सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यावर सहमत होतील.” बँक कर्मचार्‍यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संघटनेने त्यांच्या सदस्यांना कोविड-१९ विषाणूपासून वाचवण्यासाठी संसर्गाच्या काळात पाच दिवसांच्या कामाचा आठवडा सुरु केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here