मुंबई : पूजावेस्टर्न मेटलिक्स शेअर्स हे काही मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कोविड नंतर जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षांत बीएसईचा हा सूचीबद्ध स्टॉक सुमारे रु. ११ वरून रु. ५९.३५ च्या पातळीपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्याने आपल्या भागधारकांना ४०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, या स्टॉकमध्ये तेजी सुरू आहे.

या स्मॉल-कॅप कंपनीला नुकतंच अमेरिकेकडून निर्यात ऑर्डर मिळाली, ज्यामुळे स्टॉकमध्ये खरेदी करण्यात रस निर्माण झाला आणि शुक्रवारी सकाळच्या व्यापारात स्टॉकला अप्पर सर्किटला लागला. पूजावेस्टर्न मेटालिक्सचा शेअर शुक्रवारी तेजीसह उघडला आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या व्यवहारात बाजार उघडल्यानंतर काही सेकंदातच पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहोचला.

Nykaa शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर; बोनस जाहीर केल्यापासून ६ टक्क्यांची घसरण
सात दिवस सतत अप्पर सर्किटमध्ये स्टॉक
हा मल्टीबॅगर धातूचा स्टॉक गेल्या सात दिवसांपासून सतत अप्पर सर्किटला धडकत असून हा स्टॉक २१ सप्टेंबर २०२२ पासून तेजीत आहे. बीएसईवर सूचीबद्ध स्मॉल-कॅप स्टॉक एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत रु. २७.५० वरून रु. ५९.२५ पर्यंत वाढला आहे. या काळात त्याने आपल्या भागधारकांना सुमारे ११५ टक्के परतावा देत आहे. हा स्मॉल-कॅप मेटल स्टॉक ऑक्टोबर २०२२ च्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे.

Infosys चे पाऊल पडते पुढे! मार्केट कॅपच्या ‘टॉप ५’ कंपन्यांत उत्तम कामगिरी, गुंतवणूकदार मालामाल
कंपनीचा व्यवसाय
स्मॉल-कॅप कंपनीचा जगभरात मजबूत क्लायंट बेस आहे आणि आखाती, मध्य पूर्व देशांमध्ये निर्यात केली जाते आणि आता युरोप आणि अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये गुजरातमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान (सीएनसी) मशीन टूल्स आणि इतर मशीन टूल्ससह अत्याधुनिक, अल्ट्रा आधुनिक उत्पादन युनिट आहे आणि त्यात गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन तंत्रज्ञान, नवीनतम तंत्रज्ञान आणि एंटरप्राइझ उत्पादनांची श्रेणी आहे. नवीन एक्सचेंज फाइलिंगनुसार पूजावेस्टर्न मेटालिक्स लिमिटेड नॉन-फेरस मेटल स्क्रॅप, ब्रास प्लंबिंग फिटिंग्ज, ब्रास इंगॉट्स आणि ब्रास सॅनिटरी फिटिंग्जच्या उत्पादन आणि निर्यातीतील एक प्रमुख आहे.

हे पेनी स्टॉक सप्ताहअखेरच्या व्यवहारात अप्पर सर्किटमध्ये झेपावले
बीएसई सूचीबद्ध पूजा वेस्टर्न मेटालिक्स लिमिटेडचे सध्याचे मार्केट कॅप ६० कोटी रुपये आहे. त्याचे प्रति शेअर पुस्तक मूल्य ११ च्या थोडे वर आहे आणि वर्तमान EPS ०.९१ आहे. तसेच त्यांची ५२ आठवड्यांची उच्चांक बीएसईवर रु. ८६.७० आहे तर त्याचा ५२ आठवड्यांची नीचांक रु. २२.३० आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here