Live अपडेट्स…
>>
>> राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, पी. चिदंबरम आणि वेणुगोपाळ यांनीही सचिन पायलट यांना फोन करून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले. मात्र पायलट यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
>> मी सचिन पायलट यांना अतिशय प्रतिभावान, योग्य आणि काँग्रसचे प्रभावी नेते मानतो. ते मित्र देखील आहेत. आम्ही सर्व पक्षात त्यांची कदर करतो. त्यांनी आपले म्हणणे मांडायला हवे. त्यांना पूर्ण संधी आहे. सर्वच त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी तयार आहेत- अभिषेक मनु सिंघवी.
>> पक्षात कोणालाही काही म्हणायचे असेल, काही समस्या असतील त्यांनी मोकळेपणाने त्या बोलल्या पाहिजेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रत्येकाचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी तयार आहेत- रणदीप सुरजेवाला.
>>
(सविस्तर वृत्त वाचण्यासाठी करा क्लिक)
>> आज सकाळी १० वाजता होणार काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक, बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times