Cng Pump: पुण्यात येत्या १ नोव्हेंबरपासून सीएनजी पंप बंद राहणार आहेत. सीएनजीच्या कमिशनमध्ये वाढ केली नसल्याने पंप बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. २० ऑक्टोबरला सीएनजी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

वाचाः बोगस शपथपत्राप्रकरणी उद्धव ठाकरे यांना दिलासा; गुन्हे शाखेने केला मोठा खुलासा
कंपनीने जर मागण्या केल्या नाही तर डीलर्सने बेमुदत संपावर जाण्याची भूमिका घेतलेली आहे. अशी माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिली आहे. त्यामुळे आता ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पेट्रोल डिझेल महाग झाल्यानंतर पुण्यात आणि एकूणच राज्यात सीएनजी वरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अशा वेळी दिवाळीत जर सीएनजी पंप बंद राहिले तर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ शकतात.
वाचाः मोठी बातमी! तुर्कीतील कोळसा खाणीत भीषण स्फोट; २५ जणांचा मृत्यू, १२ कामगार अडकल्याची भीती
वाचाः कोर्टाने निर्दोष सुटका केली, पण ५१ दिवसांपूर्वी तुरुंगाताच झाला होता मृत्यू; पांडू नरोटोची कहाणी
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.