नांदेड : शिवसेनेच्या नेतृत्वावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या संघर्षानंतर शिवसेनेत दोन गट पडले. हा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्यानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवत शिवसेना नावही आहे तसं वापरण्यास दोन्ही गटांना बंद घातली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आणि मशाल हे पक्षचिन्ह तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल-तलवार हे पक्षचिन्ह देण्यात आलं. मात्र शिंदे यांच्या पक्षाला मिळालेलं ढाल-तलवार हे चिन्ह आता वादात सापडलं असून या चिन्हावर नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष रणजितसिंग कामठेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला पक्षचिन्हासाठी त्रिशूळ या चिन्हाची मागणी केल्यानंतर हे चिन्ह धार्मिक बाबीशी संबंधित असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने ते देण्यास नकार दिला होता. याचाच धागा पडकत आता रणजितसिंग कामठेकर यांनी ढाल-तलवार हे चिन्हही धार्मिक असल्याने तेही राजकीय पक्षाला देऊ नये, अशी मागणी केली आहे.

ठाकरेंची डोकेदुखी वाढली, ऋतुजा लटकेंविरोधात २४ उमेदवार, मुरजी पटेलांनी तर…

‘निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, त्रिशूळ ही धार्मिक निशाणी आहे. ती निशाणी कुठल्याही राजकीय पक्षाना वापरता येत नाही. त्याच प्रमाणे ढाल-तलवार हीदेखील निशाणी धार्मिक असल्याने ती कुठल्याही राजकीय पक्षांनी वापरू नये. श्री गुरू गोबिंदसिंगजी महाराज यांनी खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या स्थापनेवेळेस श्री गुरू गोबिंदसिंगजी महाराज यांनी ढाल-तलवार ही निशाणी खालसा पंथाला दिली आहे. या ढाल-तलवारीची पूजा शीख समाजातील पाचही तख्तावर केली जाते. त्यामुळे ज्या प्रमाणे त्रिशूळ हे चिन्ह धार्मिक आहे म्हणून चिन्हांच्या यादीतून बाद करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे ढाल-तलवार देखील हे चिन्ह धार्मिक असल्याने या चिन्हाचा वापर करता येणार नाही,’ अशी भूमिका रणजितसिंग कामठेकर यांनी घेतली आहे.

पुतण्यानंतर सुनील तटकरेही घेणार वेगळा निर्णय? मंत्र्याची भेट घेतल्याने चर्चा, अजित पवार म्हणाले…

‘…अन्यथा कायदेशीर लढाई लढणार’

ढाल-तलवार चिन्हावर आम्ही आक्षेप घेतला असून याचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि इतर पक्षातील नेत्यांना ट्वीट केल्याची माहिती रणजितसिंग कामठेकर यांनी दिली. दरम्यान निवडणूक आयोगाने याचा तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा कायदेशीर मार्गाने आम्ही लढा लढू, असा इशारा गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष रणजितसिंग कामठेकर यांनी दिला आहे.

4849 COMMENTS

  1. [url=http://modafinil.lol/]cheap provigil canada[/url] [url=http://augmentinp.online/]augmentin 25 mg[/url] [url=http://prednisone.lol/]prednisone 2[/url] [url=http://seroquel.charity/]seroquel cost canada[/url] [url=http://valacyclovir.cyou/]2g valtrex[/url] [url=http://onlinepharmacy.charity/]reputable online pharmacy no prescription[/url] [url=http://albuterol2023.com/]albuterol 0.9[/url] [url=http://synthroid.trade/]synthroid 0.1 mg[/url]

  2. [url=https://lasixz.com/]furosemide 40mg cost[/url] [url=https://neurontin.best/]gabapentin brand name australia[/url] [url=https://albuterol.charity/]albuterol 0.42[/url] [url=https://doxycyclin.online/]doxy[/url]

  3. [url=http://buyprovigil.monster/]modafinil 100mg[/url] [url=http://nolvadex.icu/]nolvadex price uk[/url] [url=http://tetracyclinesumycin.shop/]terramycin price in india[/url] [url=http://yasmindrospirenone.online/]how much is yasmin cost[/url] [url=http://happyfamilyrx.store/]which online pharmacy is reliable[/url]