मध्य प्रदेशात काँग्रेसचे तरुण नेते यांना फोडून तेथील कमलनाथ सरकार पाडल्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा राजस्थानकडे वळवल्याचा आरोप होत आहे. तिथे काँग्रेसचे तरुण नेते यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अर्थात, भाजप हे सारे पडद्यामागून करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याच अनुषंगानं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर तोफ डागली आहे. ‘भाजपकडे देशाची संपूर्ण सत्ता आहे. काही घरे त्यांनी विरोधकांसाठी सोडायला हवीत. यातच लोकशाहीची शान आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘राजस्थानात अजूनही आकड्यांचा संभ्रम आहे. ज्याच्याकडे आकडे आहेत, त्याचीच या खेळात सरशी होईल. त्यामुळंच जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत, तोपर्यंत भाजप उघडपणे पुढं येऊन काही करणार नाही. सरकार अस्थिर करण्याचं त्यांचं राष्ट्रीय कार्य पडद्यामागून चाललं आहे. याक्षणी भाजपच्या दृष्टीनं पायलट यांचा पोरखेळ हा काँगेसचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना फूस लावून फोडले तेव्हाही भाजपच्या दृष्टीनं हा काँगेसअंतर्गत प्रश्नच होता. महाराष्ट्रात अजित पवारांना घेऊन भाजपनं सकाळीच शपथविधी उरकला. तेव्हाही तो राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय होता. त्यामुळं अशा अंतर्गत बाबी सोयीप्रमाणे ठरत असतात,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
‘पायलट यांनी काँगेस सोडावी यासाठी मध्य प्रदेशमधून फुटलेले ज्योतिरादित्य शिंदे हे परिश्रम घेत आहेत. बाटगा जरा जास्तच जोरात बांग देतो, त्यातलाच हा प्रकार व यापासून कोणताही पक्ष दूर नाही. राजकारणात बाटग्यांना महत्त्व मिळते हा प्रकार नवा नाही,’ असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
व्हिडिओ पाहा:
मोदी व शहा यांनी प्रचंड यंत्रणा राबवून, झंझावात निर्माण करूनही राजस्थानात भाजपला सत्ता मिळाली नाही. लोकांचा कौल काँगेसच्या बाजूने होता. पायलट यांनी या विजयासाठी मोठी मेहनत घेतली हे मान्य, पण आज पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे वागून त्यांनी स्वतःला कलंकित करून घेऊ नये,’ असा सल्लाही त्यांना शिवसेनेनं दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times