नवी दिल्ली: ग्लोबल हंगर इंडेक्सची ताजी यादी जाहीर झाली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारताची सहा स्थानांनी घसरण झाली आहे. भारत आता १२१ देशांच्या यादीत १०७व्या स्थानावर आहे. या यादीमध्ये भारताची अवस्था या एका गोष्टीवरून कळू शकते की दक्षिण आशिया देशात अफगाणिस्तान वगळता अन्य सर्व देश भारताच्या पुढे आहेत.

ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारताला २९.१ इतके गुण मिळाले आहेत. भीषण पुर परिस्थिती असलेला पाकिस्तान आणि आर्थिक संकट असलेला श्रीलंका देखील भारताच्या पुढे आहेत. इतक नाही तर बांगलादेश, नेपाळ, म्यानमार या सर्व देशांना भारतापेक्षा चांगले रँकिंग मिळाले आहे. हंगर इंडेक्समध्ये भारत आता झाम्बिया, सिएरा लियोन, लायबेरिया, हैती, रिपब्लिक ऑफ कॉन्गो या देशांच्या पंक्तीत पोहोचला आहे.

काय असतो Global Hunger Index आणि कोण प्रसिद्ध करते

वेगवेगळ्या NGO स्वत:चा हंगार इंडेक्स तयार करत असतात. या शिवाय जागतिक आरोग्य संघटना देखील हंगर इंडेक्स तयार करते. आता जो हंगार इंडेक्स आला आहे तो NGOs- Concern Worldwide आणि Welthungerhilfe मिळून तयार केला आहे. हा रिपोर्ट तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र, युनिसेफ आणि फुड अॅण्ड अग्रीकल्चर ऑर्गनायजेशनसह अन्य संघटनांचा डेटा वापरला जातो.

कोणत्या आधारावर तयार होतो?

ग्लोबल इंगर इंडेक्स तयार करण्यासाठी WHO तीन गोष्टींचा विचार करते. यात अन्नधान्याची कमी, मुलांचे कमी पोषण आणि बाल मृत्यू या गोष्टींचा विचार केला जातो. तर NGOs- Concern Worldwide आणि Welthungerhilfe हे अंडरनरिशमेंट, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड मॉर्टलिटी म्हणजेच अल्पपोषण, कुपोषण, अपुरी वाढ आणि बालमूत्यू या आधारावर इंडेक्स तयार करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here