baby elephant tortured by mob: हत्तीच्या पिल्लाला जमावानं अतिशय अमानुष वागणूक दिल्याचा प्रकार आसामच्या होजाई जिल्ह्यात घडला आहे. होजाईच्या लंका शहरात हा संतापजनक प्रकार घडला. १२ ऑक्टोबरला घडलेल्या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

 

baby elephant
गुवाहाटी: हत्तीच्या पिल्लाला जमावानं अतिशय अमानुष वागणूक दिल्याचा प्रकार आसामच्या होजाई जिल्ह्यात घडला आहे. होजाईच्या लंका शहरात हा संतापजनक प्रकार घडला. १२ ऑक्टोबरला घडलेल्या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. माणसातला पशु जागा होणं काय असतं याची कल्पना हा व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल.

व्हिडीओमध्ये हत्तीचं पिल्लू जिवाच्या आकांतानं पळताना दिसत आहे. त्याच्यामागे मोठा जमाव लागला आहे. जमावातील अनेक जण पिल्लाचं शेपटू धरून ओढत आहेत. त्याला मारत आहेत. आईपासून दूर गेलेल्या हत्तीच्या पिल्लाला ग्रामस्थांनी अतिशय संतापजनक वागणूक दिली. भेदरलेलं पिल्लू जीव वाचवण्यासाठी अक्षरश: पळत सुटलं. मात्र ग्रामस्थ त्याची पाठ सोडत नव्हते. चारही बाजूंनी माणसंच माणसं दिसू लागल्यानं पिल्लू भेदरलं.

या प्रकरणी ग्रामस्थांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. सर्व आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर अनेकांनी केली आहे. त्यासाठी काहींनी मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांना टॅग केलं आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्रामस्थांनी हत्तीच्या पिल्लाला दिलेल्या वागणुकीबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here