एका तरुणानं महाविद्यालयात शिकत असलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनसमोर ढकलल्याची घटना चेन्नईत घडली. या घटनेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आरोपी तरुणीच्या परिसरातच राहतो.

 

chennai girl
चेन्नई: एका तरुणानं महाविद्यालयात शिकत असलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनसमोर ढकलल्याची घटना चेन्नईत घडली. या घटनेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आरोपी तरुणीच्या परिसरातच राहतो. दोघे एकाच महाविद्यालयात शिकत होते.

चेन्नईच्या सेंट थॉमस माऊंट रेल्वे स्थानकात बी कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या २० वर्षीय सत्यप्रियाला सतीशनं चालत्या ट्रेनसमोर ढकललं. त्यानंतर सत्यप्रियाचा मृत्यू झाला. काल दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी चेन्नईच्या अडंबक्कमचा रहिवासी आहे. फलाटावर आरोपी आणि पीडितेचा वाद झाला. यादरम्यान सतीशनं सत्यप्रियाला धक्का दिला. त्यानंतर सतीश तिथून फरार झाला.
VIDEO: संतापजनक! लहानग्या हत्तीचं शेपूट खेचलं; चपलेनं मारलं; पिल्लू जिवाच्या आकांतानं पळालं
घटनेची माहिती मिळताच पोलीस सेंट थॉमस माऊंट पोलीस स्थानकात पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. सत्यप्रियानं सतीशशी बोलणं बंद केलं होतं, अशी माहिती तिच्या मित्र परिवारानं आणि कुटुंबातील सदस्यांनी रेल्वे पोलिसांना दिली.
नववीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेनं कपडे काढायला लावले; मुलीने स्वत:ला पेटवून घेतले
सतीशनं अनेकदा सत्यप्रियाला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्यप्रियानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिच्या कुटुंबानं सतीशविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सत्यप्रियाच्या मृत्यूबद्दल समजताच मणिक्कममध्ये तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा असं कुटुंबाला वाटलं. मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचं वैद्यकीय तपासातून समोर आलं.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here