भिंड: मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एक अजब घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं आपल्याच जिल्हाध्यक्षाचं पोस्टर फाडलं. पोस्टर जमिनीवरून फेकून नेत्यानं त्यावर लघुशंका केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पोस्टर फाडून त्यावर मूत्रविसर्जन करणाऱ्या नेत्याला भाजपनं ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

भिंड जिल्ह्यातील मेहगावात ही घटना घडली. मेहगाव पंचायतीचे उपाध्यक्ष आणि भाजप नेते शैलेंद्र सिंह भदौरिया यांनी भाजपचेच नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष देवेंद्र सिंह नरवरिया यांचं टोलनाक्यावरील पोस्टर फाडलं. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर देवेंद्र सिंह पहिल्यांदाच जिल्ह्यात येत होते. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पोस्टर, बॅनर लावण्यात आले. शैलेंद्र सिंह कारमधून उतरले, त्यांनी जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यांचा पोस्टर फाडला आणि जमिनीवर फेकल. शैलेंद्र इथवर थांबले नाहीत, त्यांनी रस्त्यावर पडलेल्या पोस्टरवर लघुशंका केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
VIDEO: संतापजनक! लहानग्या हत्तीचं शेपूट खेचलं; चपलेनं मारलं; पिल्लू जिवाच्या आकांतानं पळालं
शैलेंद्र सिंह यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सारवासारव केली. माझी कार बॅनरला धडकली. त्यामुळे मी बॅनर उचलायला गेलो होतो, असं सिंह यांनी सांगितलं. मात्र सीसीटीव्हीत वेगळाच घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. पक्षातील वरिष्ठांनी त्याची दखल घेतली. यानंतर शैलेंद्र भदौरिया यांचं प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रद्द करण्यात आलं. त्यांना निलंबित करण्यात आलं. भाजप प्रदेश अध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या आदेशानं ही कारवाई झाली. भदौरियांचं कृत्य अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय आहे. अशा प्रकारचं वर्तन पक्ष कधीच सहन करणार नाही, असं शर्मा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here