अमेरिका, चीन आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) या तीन देशांतर्फे भविष्यात मंगळावर अवकाशयाने सोडण्यात येणार आहेत. या आठवड्यामध्येच या मंगळ मोहिमांना सुरुवात होत आहे.
तिन्ही देशांची अवकाशयाने तीस कोटी मैलांचा प्रवास करून पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये मंगळाच्या पृष्ठभागावर पोहोचतील. अमेरिका मंगळावर चारचाकी वाहनाच्या आकाराचा ‘रोव्हर’ पाठवणार आहे. ‘पर्सिव्हरन्स’ असे या रोव्हरचे नाव असून तो सुमारे दशकभर मंगळावरील खडकांचे नमुने गोळा करेल. त्यानंतर, या रोव्हरला पुन्हा पृथ्वीवर आणण्यात येईल.
वाचा:
कोट्यवधी वर्षांपूर्वी मंगळ ग्रहाचे स्वरूप कसे होते, तेथील नद्या, तलाव, समुद्र यांची स्थिती काय होती, हे जाणून घेण्यात शास्त्रज्ञांना स्वारस्य आहे. लागोपाठ तीन मंगळ मोहिमांना सुरुवात करणे हा निव्वळ योगायोग नसून, दर २६ महिन्यांनी पृथ्वी आणि मंगळ सूर्याच्या एकाच दिशेला आदर्श रेषेमध्ये असतात. ही स्थिती साधारणत: महिन्याभरासाठीच असल्याने या काळात मोहिमांना प्रारंभ करण्यात येणार आहे.
चीनचा प्रयत्न अयशस्वी
चीनचा यापूर्वी २०११ मध्ये रशियाच्या सोबतीने मंगळावर यान उतरवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. सध्या मंगळाच्या पृष्ठभागावर अमेरिकेची इनसाइट आणि क्युरिऑसिटी ही दोन याने असून मंगळाच्या कक्षेमध्ये अमेरिकेची तीन, युरोपची दोन आणि भारताचे एक अशी सहा याने आहेत. आता अमाल आणि तियानवेन या यानांद्वारे अनुक्रमे यूएई व चीन या देशांच्या पंक्तीत बसण्याच्या प्रयत्नात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times