नवी दिल्ली : शेतीप्रधान देश असलेला भारत आता भूकमारीच्या उंबरठ्यावर आहे. २०२२ च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची स्थिती अतिशय खालावली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारताचे रँकिंग १०७ व्या स्थानावर आहे. आपल्या लोकसंख्येच्या अन्न सुरक्षा आणि पौष्टिक गरजा पूर्ण न करणारे राष्ट्र म्हणून देशाची प्रतिमा खराब होत आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) द्वारे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भुकेचे परीक्षण आणि गणना केली जाते. भारतातील उपासमारीची पातळी २९.१ गुणांसह “गंभीर” आहे. खरंतर, १०९ व्या क्रमांकावर असलेला अफगाणिस्तान हा आशिया खंडातील एकमेव देश आहे जो भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या मागे आहे आणि आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेची स्थितीही भारतापेक्षा चांगली आहे.

गावपुढाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस; राज्यातील १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान
भारत २०२१ मध्ये ११६ देशांपैकी १०१ व्या क्रमांकावर होता तर २०२० मध्ये ९४ व्या स्थानावर होता. शेजारील देश पाकिस्तान (९९), बांगलादेश (८४), नेपाळ (८१) आणि श्रीलंका (६४) भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. आशियामध्ये फक्त अफगाणिस्तान भारताच्या मागे आहे आणि तो १०९ व्या क्रमांकावर आहे.

भारतातील कुपोषणाचे प्रमाण २०१८-२०२० मधील १४.६ टक्क्यांवरून २०१९-२०२१ मध्ये १६.३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. याचा अर्थ जगातील एकूण ८२८ दशलक्ष लोकसंख्येपैकी भारतातील २२.४३ दशलक्ष लोक कुपोषित आहेत.

सरकारने म्हटले आहे की, हा अहवाल केवळ वास्तविकतेच्या पलीकडे नाही तर लोकसंख्येच्या अन्न सुरक्षेसाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, विशेषत: करोना दरम्यान. त्यामुळे या अहवालावर सरकारकडून टीका करण्यात आली आहे.

आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस, खूप काळ याची वाट पाहिली, ओडिशातून कंत्राटी भरती धोरण हद्दपार : नवीन पटनाईक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here