Maharashtra Politics | बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात त्याची सहानभूती पाहिजे की त्याच्याच बाजूला असलेल्या महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झाली आहे त्याची सहानभूती पाहिजे?अनधिकृत भोंग्यांविरुद्धय आंदोलन करण्याऱ्या महाराष्ट्र सैनिकांना तडीपार केलंत जेल मध्ये टाकलेत त्याची सहानभूती हवीय? मनसे नेते संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंना रोखठोक सवाल. आता ठाकरे गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार?

 

Maharashtra Politics
उद्धव ठाकरे आणि अमित ठाकरे

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरे आणखी किती सहानुभूती मिळवणार?
  • वरळीत केम छो वरळी चे बोर्ड लावलेत त्याची सहानभूती हवीय?
  • गेली पंचवीस वर्षे महानगर पालिका भ्रष्टाचाराने पोखरलीत त्याची सहानभूती हवीय ?
मुंबई: शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षाचे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून मतदारांना भावनिकतेच्या मुद्द्यावरुन साद घालण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. याच मुद्द्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले आहे. देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र लिहले आहे. या पत्रात देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक सवाल विचारले आहेत. तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानभूती, तुम्ही मुख्यमंत्रीपद गमावलं तुम्हाला सहानभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानभूती,ठीक आहे. उद्धवसाहेब एकदा मराठी माणसाला समजून सांगाच तुम्हाला आणखी कशाकशाची सहानभूती पाहिजे, असा खरमरीत सवाल संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
मनसेचा नेता म्हणतो, ‘उद्धव ठाकरेंकडे एक मोठा गुण आहे, जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही’
या पत्रातून संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल विचारताना मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर एकप्रकारे ताशेरे ओढले आहेत. तसेच उद्धव यांनी अमित ठाकरे आजारी असताना मुंबईतील मनसेचे नगरसेवक चोरले, असा गंभीर आरोप देशपांडे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्याने टीका केली जात आहे. यामध्ये उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी भाजपशी संधान साधले, असा आरोप हमखास केला जातो. आता मनसेच्या नेत्याकडून तशाच धाटणीचा मुद्दा उद्धव यांच्याबाबत उपस्थित करण्यात आल्याने ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे नेते यासंदर्भात काय प्रत्युत्तर देणार, ते पाहावे लागेल.
मातोश्रीवर बोलवून ठाकरे म्हणाले, आपण लग्न करु, पण… संदीप देशपांडेंनी इतिहास काढला

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

आम्ही गेली २५ वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? २५ वर्ष मुंबई ची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार??कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला? करोना काळात लपून बसलात त्याची की पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची?महापौरांच्या मुलाला करोना काळात कंत्राट दिल त्याची सहानभूती पाहिजे की की लोकांचे करोना मध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पब ना परवानगी दिलीत त्याची सहानभूती पाहिजे? करोना मध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानभूती पाहिजे की सामान्य माणसाला हॉस्पिटल्सनी बिलामध्ये लुटलं त्याची सहानभूती पाहिजे? रेल्वे मध्ये सामान्य माणसाला प्रवेश न देता आठ आठ तास प्रवास करायला लावला त्याची सहानभूती पाहिजे? करोना मध्ये लोकांना उपाशी राहायला लागलं त्याची सहानभूती पाहिजे की शिवभोजन च्या नावाखाली भ्रष्टाचार झाला त्याची सहानभूती पाहिजे?पत्रा चाळीच्या घोटाळ्यात शेकडो मराठी माणसं बेघर केलीत त्याची सहानभूती पाहिजे? बार मालकाकडून शंभर कोटी वसूल केलेत त्याची सहानभूती पाहिजे की वाझेसारख्या अधिकाऱ्याला परत आणलंत त्याची सहानभूती पाहिजे? मा.बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात त्याची सहानभूती पाहिजे की त्याच्याच बाजूला असलेल्या महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झाली आहे त्याची सहानभूती पाहिजे?अनधिकृत भोंग्यांविरुद्धय आंदोलन करण्याऱ्या महाराष्ट्र सैनिकांना तडीपार केलंत जेल मध्ये टाकलेत त्याची सहानभूती हवीय की स्वतःच्याच भावाचे अमित आजारी असताना नगरसेवक चोरलेत त्याची सहानभूती हवीय? वरळीत केम छो वरळी चे बोर्ड लावलेत त्याची सहानभूती हवीय की चतुर्वेदी ना खासदार केलंत त्याची सहानभूती हवीय? गेली पंचवीस वर्षे महानगर पालिका भ्रष्टाचाराने पोखरलीत त्याची सहानभूती हवीय ? की सगळे अमराठी भ्रष्टाचारी कंत्राटदार महापालिकेत पोसलेत त्याची सहानभूती हवीय?, अशा सवालांची यादी संदीप देशपांडे यांनी मांडली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here