परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अकलूजआदी भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकात पाणीच पाणी साचले आहे

 

solapur-farmers
सोलापूरः परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अकलूजआदी भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकात पाणीच पाणी साचले आहे. भुईमूग, सोयाबीन, उडीद यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत बार्शी तालुक्यातील पानगाव येथील शेतकऱ्यांनी माहिती देताना आपली व्यथा व्यक्त केली आहे. यंदाच्या दिवाळीत जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे. (Solapur Farmers News)

शेतातील उभ्या पिकात पाणीच पाणी

एक आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत परतीच्या पावसाने हाहाकार माजला आहे. जुलै ते ऑगस्टदरम्यान पाऊस चांगला झाल्याने खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. पण ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे. शेतातील उभ्या पिकात पाणीच पाणी साचले आहे. जिल्हा प्रशासनातील एकही अधिकारी आजतागायत साधे पंचनामे देखील करायला आले नसल्याचे खंत यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

वाचाः गोव्याला जायचा प्लॅन करताय मग बजेट वाढवा; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

लाखो हेक्टर शेतजमिनी जमिनी पाण्याखाली


बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, मोहोळ आदी भागातील शेतजमिनीत पाणी साचले आहे. लाखो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. छोट्या मोठ्या ओढ्यांना नदीचे स्वरूप आले आहे. छोट्यामोठया नद्या नाल्यामधील पाणी शेतात पसरले आहे. विमा कंपन्यांनी सुद्धा पाहणी केली नसून जिल्हा प्रशासनाने सुद्धा पाठ दाखवली आहे. यंदाच्या दिवाळीत गोडधोड ऐवजी पाणीच नशिबी आले असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

वाचाः घर घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे…; रेल्वे कर्मचाऱ्याचे धाडस पाहून पोलिसही चक्रावले

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here