विरार : वैतरणा जेट्टी परिसरात सेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार महिला नदीत पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत नीला धमसिंह दासना (२४), संतू दासना (१४) या दोघींचा मृत्यू झाला असून दोघींना वाचवण्यात यश आले आहे.

विरार- पश्चिमेकडील वैतरणा जेट्टी परिसरात तीन बहिणी व त्यांची वहिनी अशा चार जणी शनिवारी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी आल्या. मात्र, जेट्टीवर सेल्फी काढण्याच्या नादात या चारही जणी खाडी पत्रात पडल्या. त्यातील दोघींना परिसरात असलेल्या स्थानिकांनी दोरीचा आधार देऊन बाहेर काढले. त्यांनतर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दोन चिमुकल्यांसह आईने वैनगंगेत घेतली जलसमाधी, जीवन संपवल्यामागचं धक्कादायक कारण समोर
स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. खाडीपत्रात बुडालेल्या दोन मिहिलांना वाचविण्यात यश आलं. मात्र, दोन महिलांचा मृत्यू झाला. नीला धमसिंह दासना (२४), संतू दासना (१४) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या दोन महिलांची नावे आहेत.

या सर्व महिला फणसपाडा या गावातील रहिवासी असून दासना कुटुंबातील आहेत. दररोज संध्याकाळी एकाच कुटुंबातील चौघी फेरफटका मारण्यासाठी वैतरणा जेट्टी परिसरात येत असत अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सेल्फी काढण्याच्या नादात ही दुर्घटना घडली.

चिंताजनक! भारतात उपासमार वाढली, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये पाकिस्तानलाही टाकलं मागे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here