Agriculture News : नवउद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी 15 ऑगस्ट 2022 ते 17 सेप्टेंबर 2022 दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचं (Maharashtra Startup Yatra) आयोजन करण्यात आलं होतं. या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील तळागाळातील अनेक उद्योजकांनी आपल्या कल्पना मांडल्या. यातून राज्य स्तरावर वेगवेगळ्या विभागातून 21 जणांची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे (Sarojini Phadtare) यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका म्हणून राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे. यामुळं मिलेटच्या कामाला राजमान्यता मिळाली आहे.

फडतरेंचा देवळाली प्रवरा आणि इंदापूर तालुक्यातील वडापुरी इथं प्रकल्प सुरु

अहमदनरजवळील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांचा भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका म्हणून राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे. 
सरोजिनी फडतरे आणि तात्यासाहेब फडतरे यांनी देवळाली प्रवरा आणि इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे 2012 पासून ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या लागवडीपासून ते प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मॉडर्न पद्धतीनं झटपट खाण्यासाठी ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांचे पदार्थ तयार केले आहेत. आज त्यांच्याशी एकूण 302 शेतकरी जोडले आहेत. त्यातील 29 शेतकरी हे सेंद्रिय शेती करत आहेत. आज यासाठीच त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, रोख बक्षीस एक लाख रुपये असे सत्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते समाजासाठी उत्तम भरडधान्य पदार्थ म्हणून सर्वोत्कृष्ट महिला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.


 
महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत केलं जातं आहे. राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर करण्यात आले. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामधे स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाकरीता पूरक वातावरणनिर्मिती करुन त्यातून यशस्वी उद्योजक घडवण्यासाठी इनक्युबेटर्सची स्थापना करण्यात आली. तसेच गुणवत्ता परीक्षण आणि बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या अनेक उपक्रम राबवण्यात करण्यात येतात.

राज्यात 15 ऑगस्ट 2022 ते 17 सेप्टेंबर 2022 दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचं (Maharashtra Startup Yatra) आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेचा नेमका उद्देश काय होता, याबाबतची माहिती पाहुयात.

  • महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे.
  • नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे.
  • राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे.

महत्त्वाच्या बातम्या:

Food Processing : पाच वर्षात एक जिल्हा एक उत्पादन योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here