tushar kapoor बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर याने आपल्याला दिल्या गेलेल्या वागणुकीबद्दल खुलासा करत मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. प्रत्येक स्टार किडसाठी इण्डस्ट्री सारखी नाही असं त्याने म्हटलं आहे.

 

tushar kapoor kareena kapoor

हायलाइट्स:

  • प्रत्येक स्टार किडला दिली जाते वेगळी वागणूक
  • पहिल्याच चित्रपटाला करिना आली होती उशिरा
  • तासनतास वाट पाहत बसला होता तुषार कपूर
मुंबई- बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून इनसायडर आणि आऊटसायडरवर वाद सुरू आहे. नेहमी बॉलिवूड कलाकारांच्या मुलांना चित्रपट लगेच मिळत असल्याचा आरोप केला जातो. त्यांना कोणतंही स्ट्रगल करावं लागत नसल्याचं म्हटलं जातं. मात्र बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर असं मानत नाही. तुषार लोकप्रिय अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा आहे. त्याची बहीण एकता कपूर देखील बॉलिवूडमधील मोठी निर्माती आहे. तरीही तुषारला चित्रपटातून म्हणावी तशी ओळख मिळू शकली नाही आणि अजूनही तो स्वःताला इण्डस्ट्रीच्या बाहेरचा मानतो.

तुषारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या भावना व्यक्त करत म्हटलं, ‘प्रत्येक स्टार किडसाठी रेड कार्पेट घातलं जात नाही. जेव्हा मी माझा पहिला चित्रपट केला होता ‘मुझे कुछ कहना है’ तेव्हा मला माझ्या एका को-स्टारसाठी खूप वेळ वाट पाहत बसावं लागलं होतं. दुसरी स्टारकिड करिनासाठी सुद्धा १२- १४ तास वाट पाहावी लागली होती कारण ती एकाच वेळेस ४ चित्रपटात काम करत होती. तिचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होणार होता पण तिची डिमांड एवढी होती की तिने तेव्हाच खूप जास्त चित्रपट साइन केले होते.’

तुषारने यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत देखील या विषयावर भाष्य केलं होतं. तेव्हा त्याने म्हटलं होतं, ‘मी माझ्या वडिलांच्या चुकांमधून शिकलो. स्टार किड असल्यामुळे आम्हाला पहिला चित्रपट तर लगेच मिळतो पण पुढे अनेक गोष्टी आपल्या आपल्यालाच शिकायच्या असतात. आम्ही काहीही केलं तर आम्ही सगळ्यांच्या निशाण्यावर असतो.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here