Maharashtra politics | मुरजी पटेली यांच्या संपत्तीबाबत बोलायचे झाल्यास, त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेचा एकूण आकडा ११.७ कोटी रुपये इतका आहे. पटेल कुटुंबीयांच्या मालकीची १०.४१ कोटींची जंगम मालमत्ता आहे. तर मुरजी पटेल यांच्याकडे १.२९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावरही कोणताही पोलीस गुन्हा दाखल नाही. पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

 

Andheri Byelection
अंधेरी पोटनिवडणूक

हायलाइट्स:

  • मुरजी पटेल हे नववी पास आहेत
  • ऋतुजा लटके या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण १४ उमेदवार उतरले असले तरी मुख्य लढत ही भाजपचे मुरजी पटेल आणि ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यात असेल. या दोघांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज भरले. त्यावेळी मुरजी पटेल आणि ऋतुजा लटके यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञपत्रातून दोन्ही उमेदवारांचा शैक्षणिक आणि संपत्तीचा तपशील समोर आला आहे. त्यानुसार, मुरजी पटेल हे नववी पास आहेत, तर ऋतुजा लटके या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत.

शिक्षणाच्या बाबतीत मुरजी पटेल हे ऋतुजा लटके यांच्यापेक्षा पिछाडीवर असले तरी संपत्तीच्या बाबतीत मुरजी पटेल हे लटके यांच्यावर भारी पडत आहेत. ऋतुजा लटके यांच्या कुटुंबीयांची एकूण मालमत्ता सुमारे ९.२५ कोटी इतकी आहे. ऋतुजा लटके आणि रमेश लटके या दोघांची मिळून जंगम मालमत्ता ८.५ कोटी रुपये आहे. तर स्थावर मालमत्तेचा आकडा १.७४ कोटीच्या घरात जातो. याशिवाय, ऋतुजा लटके यांच्यावर १५ लाख रुपये आणि रमेश लटके यांच्या नावावर २ कोटी रुपयांचे कर्ज आहे. लटके यांच्यावर कोणताही गुन्हा नाही.
Andheri Bypoll : भाजपच्या मुरजी पटेल यांना काँग्रेसमधून छुपी रसद? ‘ही’ गोष्ट ठरणार गेमचेंजर
मुरजी पटेली यांच्या संपत्तीबाबत बोलायचे झाल्यास, त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेचा एकूण आकडा ११.७ कोटी रुपये इतका आहे. पटेल कुटुंबीयांच्या मालकीची १०.४१ कोटींची जंगम मालमत्ता आहे. तर मुरजी पटेल यांच्याकडे १.२९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावरही कोणताही पोलीस गुन्हा दाखल नाही.

भाजपला मोठा धक्का; मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा
अंधेरी पूर्व मतदारसंघात ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी असेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here