मुंबई: काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय मालिकेत आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांनाच आपला फॉर्म दाखवून देणारा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर आपला आज ३१ व वाढदिवस साजरा करत आहे. या खास निमित्ताने जगभरातील क्रिकेट चाहते आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची होणारी पत्नी मिताली परुलकरनेही शार्दुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ज्यावर स्टार क्रिकेटरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. शार्दुलचा टी-२० विश्वचषकासाठी बॅकअप खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. आता शार्दुलही ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे.

शार्दुल ठाकूरसोबतचा एक छान पोझ असलेला फोटो शेअर करत मिताली परुलकरने लिहिले, ‘तुला आजच्या सर्वात मोठ्या आनंदाच्या शुभेच्छा.’ आणि पुढे हार्टचा ईमोजी टाकून शार्दूलला टॅग केले आहे. या फोटोमध्ये मिताली पोझ देत कॅमेराकडे बघत आहे तर शार्दूलची नजर यावेळेस मितालीवर खिळली आहे. हा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना शार्दुल ठाकूरने हार्ट इमोजीसह धन्यवाद असेही लिहिले.

T20 World Cup 2022 ला आजपासून सुरुवात, कोण आहेत प्रबळ दावेदार, बक्षीसाची रक्कम किती, जाणून घ्या प्रत्येक तपशील

Shardul Thakur Instagram story

शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांचा गेल्या वर्षी २९ नोव्हेंबरला साखरपुडा झाला. मुंबईत एका साध्या सोहळ्यात दोघांनी एकमेकांसोबतच हे नातं एक पाऊल पुढे नेलं. या सोहळ्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. शार्दुल ठाकूर हा मुंबईचा रहिवासी असून तो त्याची गर्लफ्रेंड मिताली परुलकरसोबत अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होता. असे मानले जात आहे की पुढील वर्षी टी-२० विश्वचषकाच्या आसपास दोघेही लग्न करू शकतात.

T20 World Cup साठी ICC चे नियम, पाऊस पडला किंवा सामना टाय झाल्यास….

गोलंदाजीशिवाय शार्दुल ठाकूर बॅटनेही शानदार खेळी खेळतो. अलीकडेच, लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५१ धावांत चार विकेट गमावल्या होत्या, पण सॅमसन (नाबाद ८६) आणि शार्दुल (३३) यांनी शानदार भागीदारी करून भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या. मात्र, त्या सामन्यात भारतीय संघाला नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

पराभव न्यूझीलंडचा पण टेन्शन वाढलं भारताचं, मेलबर्नमध्ये पाकविरुद्ध कशी जिंकणार टीम इंडिया?

शार्दुलचा आंतरराष्ट्रीय विक्रम

शार्दुल ठाकूरने आतापर्यंत भारतासाठी ८ कसोटी, २७ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान शार्दुलने कसोटीत २७, एकदिवसीय सामन्यात ३९ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३३ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, ठाकूरने आयपीएलमध्ये ७५ सामने खेळले आहेत आणि २८.५४ च्या सरासरीने आणि १८.९० च्या स्ट्राइक रेटने ८२ विकेट घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here