Pune News : चाकण येथे दोघांची हत्या करुन आरोपी हा वाशिम येथील जंगलात फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चाकण पोलिसांकडून संबधित आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.

 

Pune Crime News
Pune News: बिल्डिंगमध्ये एन्ट्री न दिल्याने दोघांचा खेळ खल्लास केला, पोलिसांनी वाशिमच्या जंगलात जाऊन मुसक्या आवळल्या
पुणे : पुणे जिल्हा गुन्हेगारीचे हब होत चालल्याचे चित्र दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. चाकण परिसरातून अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. बिल्डिंगमध्ये येऊ न दिल्याच्या रागातून एकाने दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण येथे दोघांची हत्या करुन आरोपी हा वाशिम येथील जंगलात फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चाकण पोलिसांकडून संबधित आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.

प्रदीप दिलीप भगत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वाशिम येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सूरज चव्हाण आणि अनिकेत पवार यांच्याशी आरोपीचा वाद झाला होता. त्यातून त्याने या दोघांची हत्या केली होती. याबाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी गावातील भक्ती अपार्टमेंटमध्ये येऊ न दिल्याच्या रागातून आरोपीने दोघांची हत्या केली होती. त्यानंतर आरोपी वाशिम येथील जंगलात फरार झाला होता. चाकण पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी वाशिम येथे रवाना झाले होते.

प्रत्येक स्टारकीडसाठी रेड कार्पेट नसतं; मी करिनाची १४ तास वाट बघितली होती- तुषार कपूर
त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या नातेवाइकांच्या तांड्यात आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलिस येण्याची त्याला चाहूल लागल्याने त्याने जंगलात पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. बिल्डींगमध्ये प्रवेश करून दिला नाही म्हणून त्या गोष्टीचा राग मनात धरुन आपण दोघांची हत्या केल्याची कबूली त्याने दिली. या प्रकरणाचा अधिक तपास चाकण पोलिस करत आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वत-च्या कामात व्यस्त,त्यांना शेतकऱ्यांशी काही घेणंदेणं नाही | अंबादास दानवे

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here