औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रमेश केरे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मराठा मोर्चावेळी राजकीय नेत्यांकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा आरोप होत होता. सोशल मीडियावरून होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर रमेश केरे पाटील यांनी आज थेट फेसबुक लाईव्ह करूनच स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याने केरे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

रमेश केरे पाटील यांनी विष प्राशन करण्याआधी आपल्यावर होत असलेल्या विविध आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, ‘मागील २० वर्षांपासून मी मराठा समाजातील विविध प्रश्नांवर लढा देत आहेत. मी कधीही समाजाला विकण्याचं काम केलेलं नाही. चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माझ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी गंभीर आरोप केले. मात्र मी कधीही कोणाकडून एक रुपयाही घेतलेला नाही,’ असं म्हणत केरे पाटील यांनी आपली बाजू मांडली.

राज ठाकरेंनी एकाच झटक्यात मारले ३ पक्षी? फडणवीसांना पत्र लिहिण्यामागील महत्त्वाची कारणे

‘मराठा मोर्च्यात झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी होऊन संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत. तसंच ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी रमेश केरे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, मराठा मोर्च्याशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने थेट फेसबुक लाईव्हरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here