याबाबत प्रत्यक्षदर्शिंनी दिलेली माहिती अशी की, बोरिवली ते सातारा शिवशाही एसटी बस ही सुस खिंडीतून जात असताना या बसणे रस्त्यावरून चाललेल्या गाड्यांना अचानक धडक देण्यास सुरुवात केली. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. एसटीचा वेग जास्त असल्याने तिने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिली. यामुळे काय होतंय ते काहीच कळेना अशी लोकांची अवस्था झाली होती. मात्र, ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडली असे प्रत्यक्ष नागरिकांनी सांगितले आहे. या घटनेत चार चाकी गाड्यांसह एका मोटार बाईकचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
एसटी चालक संतोष माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेऊन ती भर रस्त्यात बेफाम चालवून त्याने ९ जणांना चिरडले होते. या भीषण घटनेत ३७ जण जखमीही झाले होते. बसने दिलेल्या धडकेमुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २५ वाहनांचा चक्काचूर झाला होता. या प्रकरणी, शिवाजीनगर न्यायालयात वर्षभर खटला चालला होता.
न्यायालयाने ८ एप्रिल २०१३ रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा रद्द करत जन्मठेप ठोठावण्याचा निर्णय घेतला होता.