अमरावती : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. तसंच दुसरीकडे पिकांवर पसरणाऱ्या विविध रोगांनीही बळीराजा अडचणीत आला आहे. अशातच अमरावती जिल्ह्यात आज एका शेतकऱ्याने आपल्यावर ओढावलेल्या संकटानंतर चक्क संत्रा झाडांचा दशक्रिया विधी घालत स्वतःच जेसीबीच्या माध्यमातून संत्रा भाग उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील प्रदीप बंड या शेतकऱ्याने शासनाच्या नागपूर येथील सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांचा निषेध करत ही संत्राबाग उद्ध्वस्त केली आहे. अमरावती जिल्हा हा मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक म्हणून सर्वदूर परिचित आहे. येथील अचलपूर परिसरात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून संत्रावर विविध रोग सातत्याने हल्ला करत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी बाग उद्ध्वस्त झाल्या आहेत संत्र्याचं निरोगी व चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता यावं, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नागपूर येथे सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली होती. यातून मार्गदर्शन मिळून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, ही अपेक्षा होती. मात्र वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही लाभ होत नसल्याने याचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

दिवसा टीका करणाऱ्यांना मोदी रात्री भेटी देत नाहीत, राधाकृष्ण विखे पाटलांचा नेमका रोख कुणाकडे?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांचा हा मतदारसंघ आहे. खासदार नवनीत राणा व राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासारखे महत्त्वाचे नेते जिल्ह्यात असताना सुद्धा शासन स्तरावरून मार्गदर्शन आणि योग्य उपायोजना होत नसल्याने शेतकरी सातत्याने संत्राभागा उद्ध्वस्त करत असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here