नेमका काय घडला प्रकार?
एका शुल्लक वादातून दोन तरुणांमध्ये भांडण सुरू झाले. त्यांच्या दादागिरीमुळे रस्त्यावर तब्बल वीस मिनिटांवर ट्राफिक जाम झाले होते. अकोला शहरातील जवाननगर रस्त्यावर आज रविवारी रात्री ७ वाजून ५० वाजताच्या सुमारास या दोन तरुणांमध्ये वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाचा हलका धक्का लागलाय. त्यातून हा वाद झाला असे समजते. मात्र वाहन दुसऱ्याचे अन् वाद तिसऱ्याशी असा प्रकार इथे पाहायला मिळाला. जवाननगर रस्त्यावरच एका दुकानाचं उद्घाटन सुरू होतं. यावेळी इथे जमलेल्यालोकांनाया दोन तरुणांनी अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान हे दोघेही दारू पिऊन असल्याचे समजते. परंतु, त्यांचा राडा पाहून कोणीही मध्यस्थी करण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनधारकांना तब्बल वीसवर मिनिटे नाहक त्रास सहन करावा लागला.
पोलिसांची वेळीच हजेरी; पुढील अनर्थ टळला..
यादरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील हे वाहनातून उतरले आणि त्या तरुणांकडे गेले. मात्र पोलिसांना पाहून या दोन्ही तरुणांनी पळ काढला. त्यामुळे पोलिसांच्या हाती ते लागू शकले नाही. लागलीच पोलिसांनी विस्कळीत झालेल्या वाहतुकीला सुरळीत केले अन् वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, हे दोन्ही तरुण अनेकांच्या अंगावर धावून त्यांना मारण्यासाठी जात होते, तसेच त्यांना अश्लील शिवीगाळ देखील करत होते. परंतु पोलिसांची वेळीच घटनास्थळी हजेरी लागल्याने पुढील घटना टळली आहे.