मुंबई : गेल्या आठवड्यात शुक्रवारी म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी शेअर बाजाराने चांगले बाउंसबॅक केले. व्यापारी सप्ताहाचा शेवटचा दिवस भारतीय बाजारासाठी दिलासादायक ठरला आणि मजबूत जागतिक संकेतांमुळे शुक्रवारी भारतीय बाजार तेजीसह बंद झाले. शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी निफ्टी आणि सेन्सेक्स मजबूतीसह उघडले.

बाजार उच्च पातळी टिकवून ठेवू शकला नसला तरी हिरव्या चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स ६८४.६४ अंकांच्या वाढीसह ५७,९१९.९७ वर बंद झाला, तर निफ्टी १७१.३५ अंकांनी वाढून १७,१८५.७० वर बंद झाला. बाजार तेजीत बंद झाल्यानंतर आता सोमवारी बाजाराची वाटचाल कशी असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून असेल.

बाजारात मोठे चढ-उतार पण ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलासा, १ आठवड्यात दिला भरगोस रिटर्न
निफ्टी सध्या शॉर्ट टर्म कंसोलिडेशन टप्प्यात
ब्रोकरेज हाऊस शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले की, आज निफ्टीने १७०००-१६९५० च्या सपोर्ट झोनमधून जोरदार उडी घेतली. पण निफ्टीला सुरुवातीची वाढ कायम ठेवण्यात यश आले नाही. बाजार अजूनही अल्पकालीन एकत्रीकरणाच्या टप्प्यात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या निफ्टी एका श्रेणीत व्यवहार करताना दिसतो. १७०५० निफ्टीला सपोर्ट म्हणून काम करेल तर १७३५० च्या पातळीवर रेझिस्टन्स दिसतो.

कंपनीला मिळाली अमेरिकेतून ऑर्डर, शेअर सलग ७ दिवस अपर सर्किट लागला; पाहा कोणता आहे हा स्टॉक
चलनवाढीच्या आकडेवारीचा बाजाराच्या हालचालींवर परिणाम
जगभरात चलनवाढीचे आकडे महत्त्वाचे बनले आहेत आणि ते बाजाराच्या हालचालींवर सतत प्रभाव टाकत आहेत. गुरुवारी अमेरिकेतील महागाईची आकडेवारी समोर आल्यानंतर बाजारात गोंधळाचे वातावरण होते. पण सुरुवातीला घसरण झाल्यानंतर अमेरिकन बाजारांनी चांगली तेजी दर्शविली. परिणामी शुक्रवारी भारतासह आशियाई बाजारात उसळी दिसली.

IPO असावा तर असा! शेअरच्या लिस्टिंगपूर्वी चांदी, तुमच्याकडे आहे का?
शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग आणि वित्तीय समभागांमध्ये चांगली वाढ दिसून आली. त्याचवेळी बाजाराला सेवा क्षेत्रातील शेअर्सचाही पाठिंबा मिळाला. ऑटो क्षेत्रातील समभाग मजबूतपणे उघडले असले तरी दिवसअखेरीस सर्व फायदे गमावले. याशिवाय मेटल, मीडिया, रियल्टी आणि कमोडिटी शेअर्समध्येही घसरण दिसून आली. शुक्रवारी आणि वीकेंडला (शुक्रवार-शनिवार) निफ्टी आणि फ्युचर्स ट्रेडिंगच्या अनेक कंपन्या निकाल जाहीर करतील, त्यावर सोमवारी बाजाराची प्रतिक्रिया दिसून येईल. इन्फोसिसने आर्थिक वर्ष २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीचे (Q2) निकाल एक दिवस आधी जाहीर केले. निकाल जाहीर केल्यानंतर शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांनी वाढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here