हा आयपीओ गुंतवणूकदारांना लिस्टिंग नफा देऊ शकतो असे ग्रे मार्केटमधील संकेत आणि बाजारातील तज्ञांचा कल सांगत आहे. आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्याला ७२ पट सबस्क्रिप्शन मिळाले. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया आयपीओची किंमत ५६ ते ५९ रुपये प्रति शेअर होती. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडचे ३६ शहरांमध्ये ११२ दुकाने आहेत. यातील बहुतांश दुकाने आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि एनसीआरमध्ये आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षात कामकाजातून ४३४९.३२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर वर्षभरापूर्वी हा आकडा ३२०१.८८ कोटी रुपये होता. निव्वळ नफा २०२१-२२ या आर्थिक वर्षात वार्षिक आधारावर १०३.८९ कोटी रुपयांवरून ४०.६५ कोटी रुपयांवर घसरला.
ग्रे मार्केटवरील कामगिरी
दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट शेअर्सच्या बाबतीत ग्रे मार्केट सेंटिमेंट स्थिर राहिले आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्टचे शेअर्स शुक्रवारी ग्रे मार्केटमध्ये २९ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स मार्ट IPO ग्रे मार्केट प्रीमियम आज २९ रुपये आहे. गेल्या शुक्रवारी हा शेअर ३४ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता. आयपीओ उघडण्याच्या दिवशी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी ग्रे-मार्केटमध्ये शेअर ३२ ते ३३ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत होता. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स मार्टच्या शेअर्सवर ग्रे मार्केट जोरदार तेजीत आहे. त्यामुळे, ग्रे मार्केटनुसार सोमवारी बीएसई आणि एनएसईवर शेअर्स सूचिबद्ध झाल्यावर मजबूत सूचीबद्ध नफ्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
GMP वर गुंतवणूकदारांचे लक्ष
ग्रे मार्केट हे अनौपचारिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. आयपीओची प्राइस बँड निश्चित होताच, आयपीओच्या सूचीबद्ध नसलेल्या समभागांची ट्रेडिंग सुरू होते आणि IPO ची सूची होईपर्यंत ते चालू राहते. अनेक गुंतवणूकदार कोणत्याही आयपीओसाठी अपेक्षित सूचीबद्ध किंमत जाणून घेण्यासाठी ग्रे मार्केट प्रीमियम पाहतात.
पैसे गुंतवण्याचा सल्ला
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या आयपीओबाबत ब्रोकरेजचे मत सकारात्मक होते. एखाद्याने कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करावी असे अनेक बाजार तज्ञांचे असेही मत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्याचे मूल्यांकन वाजवी असल्याचे ब्रोकरेज IPO नोटमध्ये असे लिहिले होते. कंपनी मजबूत वाढीवर लक्ष केंद्रित करते आणि महसूल वाढ व मार्जिन यांच्यातील समतोल राखण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज आणि इंडसेक सिक्युरिटीजने IPO ला सबस्क्राईब रेटिंग दिले होते.