Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Oct 2022, 12:29 pm

Maharashtra Politics | आतापर्यंत अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी, कोणता विरोध होता, ते माहिती नाही. पण काल राज ठाकरे आणि शरद पवार यांनी एकदम अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यामुळे या सगळ्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील (MCA) राजकारण कारणीभूत आहे का, असा वास येत असल्याचे नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले.

 

Ashish Shelar Sharad pawar
आशिष शेलार आणि शरद पवार

हायलाइट्स:

  • येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक
  • राज ठाकरे आणि शरद पवारांकडून एकाचदिवशी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकाच दिवशी केलेल्या आवाहनाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. या सगळ्याला राजकीय वास येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA) निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीआहे. ही पैशाची, खजिन्याची निवडणूक आहे. एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेले राजकारण सध्या राज्यातील आणि देशातील लोक पाहत आहेत. आतापर्यंत अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी, कोणता विरोध होता, ते माहिती नाही. पण काल राज ठाकरे आणि शरद पवार यांनी एकदम अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यामुळे या सगळ्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील राजकारण कारणीभूत आहे का, असा वास येत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होत आहे. यामध्ये एमसीएचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, याची सर्वात जास्त उत्सुकता आहे. भाजप नेते आशिष शेलार आणि क्रिकेटपटू संदीप पाटील हे दोघेजण अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. सुरुवातीला शरद पवार हे संदीप पाटील यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. परंतु, काही दिवसांपूर्वी अचानक राजकीय सूत्रं फिरली आणि शरद पवार यांच्या पॅनलने ऐनवेळी आपली ताकद आशिष शेलार यांच्या पाठिशी उभी केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्यही व्यक्त करण्यात आले होते.
Andheri Bypoll: अंधेरीची पोटनिवडणूक लढवण्यासाठी आशिष शेलार इतके आग्रही का? जाणून घ्या कारण
शरद पवार यांनी यापूर्वी मुंबईपासून ते आयसीसीपर्यंत सर्वच संघटनांची अध्यक्षपदं भूषवली आहेत. पण वयाच्या नियमामुळे त्यांना आता एमसीएची निवडणूक लढवता येणार नाही.शरद पवार हे सुरुवातील संदीप पाटील यांना एमसीएचे अध्यक्षपद मिळण्यासाठी अनुकूल होते. परंतु, अध्यक्ष झाल्यानंतर संदीप पाटील हे शरद पवार यांच्या सूचना कितपत ऐकतील, ही शंका आहे. त्यामुळे आशिष शेलार हे शरद पवार यांना अधिक जवळचे वाटले असावेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी आशिष शेलार आणि शरद पवार यांची युती झाल्याची चर्चा आहे. एमसीएची हीच निवडणूक आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव टाकताना दिसत आहे. त्यामुळे आता भाजप अंधेरी पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस कात्रीत, अंधेरी पोटनिवडणूक लढवण्यावर आशिष शेलार ठाम, राज ठाकरेंच्या मागणीचं काय?

शरद पवारांचं आशिष शेलारांच्या क्लबसाठी मतदान

गेली अनेक वर्ष शरद पवार पारसी पायोनियर क्लबकडून मतदान करतात. मात्र काही महिन्यांपूर्वी आशिष शेलारांनी हा क्लब विकत घेतला. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार शेलारांच्या क्लबसाठी मतदान करणार आहेत. एमसीए निवडणुकीवर गेल्या काही दशकांपासून शरद पवार यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकमेकांना मदत करत असल्याचं याआधीही दिसून आलं होतं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here