मुंबई : व्यावसायिक सेवा उद्योगात कार्यरत असणाऱ्या कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लिमिटेडच्या (Confidence Futuristic Energytech Ltd) शेअर्स (Shares) ने गेली अनेक वर्षे आपल्या गुंतवणूकदारांना (Investors) मोठा परतावा (Multibagger Return) दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळने शेअर्स स्प्लिट (Shares Split) म्हणजे विभाजीत करण्याची घोषणा केली आहे. १० रुपये दर्शनी मूल्याचे दोन शेअर्स ५ रुपये दर्शनी मूल्याच्या दोन शेअर्समध्ये विभाजीत होणार आहेत. यासोबतच शेअर्स स्प्लिटची रेकॉर्ड डेटही बैठकीत जाहीर करण्यात आली आहे.

Electronics Martचे जबरदस्त लिस्टिंग! गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी मालामाल
ही रेकॉर्ड डेट
शेअर्स स्प्लिट (Shares Split) साठी कंपनीच्या संचालक मंडळाने ३ नोव्हेंबर २०२२ (गुरुवार) ही रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. कंपनीने शेअर बाजाराला (Share Market) या विषयी माहिती दिली आहे. शुक्रवारी कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लिमिटेडचा समभाग ४.९९ टक्क्यांच्या उसळीसह ३९९.८५ रुपयांवर बंद झाला.

बाजारात मोठे चढ-उतार पण ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलासा, १ आठवड्यात दिला भरगोस रिटर्न
मल्टीबॅगर परतावा
कंपनीच्या शेअर्सची किंमत २५ जून २०१८ रोजी १२.५० रुपये होती. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३,०९८.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीने पाच वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत शेअर्स ठेवले असते तर त्याची किंमत ३२ लाख रुपये झाली असती.

Nykaa शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर; बोनस जाहीर केल्यापासून ६ टक्क्यांची घसरण
वर्षात ७४९ टक्के परतावा
कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेकच्या शेअर्सची किंमत २६ ऑक्टोबर २०२१ रोजी ४७.१० रुपये होती. गेल्या वर्षभरात या शेअर्सच्या ७४८.९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवलेल्या व्यक्तीच्या गुंतवणुकीचे मूल्य यावेळी ८.४८ लाख रुपये झाले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here