नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचे उद्घाटन केले. त्यामुळे आता बँक आणि ग्राहकांमधील अंतर आणखी कमी होणार आहे. या सेवेद्वारे तुम्हाला बँकेत खाते उघडण्यासाठी आणि कर्ज अर्जापासून ते बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. कारण या सर्व सुविधा डिजिटल बँकिंग युनिटवर उपलब्ध असतील.

डिजिटल बँकिंग युनिटच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही सेवा आधुनिक भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. या डिजिटल बँकिंग सेवा पूर्वीपेक्षा अधिक सोप्या होणार आहेत. यामुळे खेड्यापाड्यात आणि लहान शहरांमध्ये पैसे पाठवण्यापासून कर्ज घेण्यापर्यंत सर्व काही सोपे होईल.

RBI चा डिजिटल रूपया लवकरच लॉंच होणार; जाणून घ्या याचे फायदे, तुमच्या पेमेंटवर काय परिणाम होईल
डिजिटल बँकिंग युनिट म्हणजे काय?
डिजिटल बँकिंग युनिट हे एक केंद्र आहे जिथे बँकिंग उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. येथे ग्राहकांना डिजिटल व्यवहार करणे सुरक्षित आणि सोपे होईल. या युनिट्समध्ये सर्व बँकिंग सुविधा उपलब्ध असतील आणि तुम्हाला त्यांच्यासाठी नेहमी बँकेत जाण्याची गरज नाही.

डिजिटल बँकिंग युनिट कसे काम करेल?
आयसीआयसीआय बँकेच्या निवेदनानुसार डिजिटल बँकिंग युनिटमध्ये दोन वेगळे झोन असतील – एक स्वयं-सेवा क्षेत्र आणि एक डिजिटल सहाय्य क्षेत्र. सेल्फ सर्व्हिस झोनमध्ये एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि मल्टी फंक्शनल किओस्क असेल जे पासबुक प्रिंटिंग, इंटरनेट बँकिंगसह अनेक सेवा प्रदान करेल.

कर्जे देणाऱ्या ॲप्सना RBI ची तंबी, पाहा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास काय म्हणाले
आयसीआयसीआय बँकेने सांगितले की एक डिजी शाखा किओस्क असेल, जो मोबाईल बँकिंग अॅपवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा प्रदान करेल. हा झोन एक डिजिटल संवादात्मक स्क्रीन प्रदान करेल जिथे ग्राहक उत्पादन ऑफर आणि आवश्यक सेवांसाठी चॅटबॉट्सद्वारे संवाद साधू शकतात. त्याच वेळी, एचडीएफसी बँकेचे डिजिटल बँकिंग युनिट इंटरएक्टिव्ह एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, इंटरएक्टिव्ह डिजिटल वॉल, नेट बँकिंग किओस्क / व्हिडिओ कॉल आणि टॅब बँकिंग वापरण्यास सक्षम होइल. बहुतेक सेवा स्वयं-सेवा मोडमध्ये असतील आणि चोवीस तास उपलब्ध असतील. तर, दोन बँक कर्मचार्‍यांनी चालवल्या जाणार्‍या डीबीयूमध्ये एक सहाय्यक क्षेत्र देखील असेल.

बँका, वित्तीय संस्थांसाठी RBI ची नियमावली; डिजिटल कर्जदारांच्या सुरक्षेसाठी आता नियम कडक
काही सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी DBU सेट केले
सरकारच्या या उपक्रमात देशातील ११ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, १२ खाजगी क्षेत्रातील बँका आणि एक लघु वित्त बँक सामील होत आहेत. या मालिकेत आयसीआयसीआय बँकेने रविवारी उत्तराखंडमधील डेहराडून, तामिळनाडूमधील करूर, नागालँडमधील कोहिमा आणि पुद्दुचेरी येथे चार डिजिटल बँकिंग युनिट्स (DBUs) सुरू करण्याची घोषणा केली.

तसेच जना स्मॉल फायनान्स बँकेने बिहटा, बिहार आणि बेरो, झारखंड येथे DBU लाँच केले आहेत. HDFC बँकेने हरिद्वार, चंदीगड, फरीदाबाद आणि दक्षिण २४ परगणा, पश्चिम बंगाल येथे डिजिटल बँकिंग युनिट्स देखील सुरू केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here