Maharashtra Politics | भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करुन महाराष्ट्र हिताच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला आहे. पक्षाचा हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी मान्य असून त्यातील सगळे पैलू आता समोर आले आहेत. भाजपनं घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रथा-परंपरेला उच्च स्तरावर नेणारी आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले. मुरजी पटेल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याच्या सूचना.

हायलाइट्स:
- आपली ऊर्जा राखून ठेवा
- महापालिका निवडणुकीत आपण याचा सदुपयोग जरुर करुयात
मी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, पक्षानं निर्णय तर घेतलाच आहे, पण आपली ऊर्जा राखून ठेवा. दोन महिन्यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपण याचा सदुपयोग जरुर करुयात, असे आशिष शेलार यांनी म्हटले. त्यामुळे आगामी मुंबई महागनरपालिका निवडणुकीत मुरजी पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याचा अंदाज आहे. तसेच शेलार यांच्या या वक्तव्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याचे संकेत मिळत आहेत. पोटनिवडणुकीतून मुरजी पटेल यांना माघार घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकशाहीत भावना व्यक्त करणं गरजेचं आहे, पण स्थानांतर होऊ नये. भाजपचे कार्यकर्ते या गोष्टीचे संपूर्ण भान राखतील याची मला अपेक्षा आहे,असेही शेलार यांनी म्हटले.
आशिष शेलार आणखी काय म्हणाले?
भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करुन महाराष्ट्र हिताच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला आहे. पक्षाचा हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी मान्य असून त्यातील सगळे पैलू आता समोर आले आहेत. भाजपनं घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रथा-परंपरेला उच्च स्तरावर नेणारी आहे.
मुरजी पटेलांच्या कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी नागपूर येथून मुरजी पटेल हे अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अंधेरीत मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. ‘राज ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणांनी अंधेरी पूर्वचा परिसर दणाणून गेला होता. इतक्या दिवसांच्या प्रचारानंतर मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे, ही बाब अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे मुरजी पटेल यांचा एक कार्यकर्ता ओक्साबोक्शी रडायला लागला. तर अन्य एका कार्यकर्त्याने ‘सगळे चोर आहेत’, अशी संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.